औरंगाबाद : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य शासन तसेच तसेच परिवहन विभागाने दिलेल्या निर्देशांची कडक अंमलबजावणी करण्याचा निर्णय औरंगाबाद स्मार्ट सिटी बस प्रशासनाने घेतला आहे. यापुढे स्मार्ट सिटी बसमध्ये प्रवास करताना मास्क घातलेल्या प्रवाशांनाच बसमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. शिवाय प्रवासादरम्यान मास्क घालणे अनिर्वाय असणार आहे.
नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई तसेच वेळप्रसंगी गुन्हे दाखल करण्यात येतील. कोरोनाबाबत सर्वत्र वाढत चाललेल्या निष्काळजीपणाला आळा घालण्यासाठी सर्व संबंधित विभागाने सतर्क राहावे आणि कोरोना कोरोना नियंत्रणासाठी लागू असलेल्या नियमावलीची कडक पद्धतीने अंमलबजावणी करावी, असे निर्देश विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दिले आहेत. याच पार्श्वभूमीवर औरंगाबाद स्मार्ट सिटी बस प्रशासनाने नागरिकांच्या हितासाठी तसेच कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी एक निर्णय घेतला आहे. यापुढे बसमध्ये प्रवास करताना मास्क घालणे गरजेचे असणार आहे. केवळ दिखाव्यापुरते नव्हे तर प्रवासादरम्यान सुद्धा मास्क घालूनच बसमध्ये बसावे लागणार आहे.
स्मार्ट सिटी बस विभाग चे मुख्य चालन व्यवस्थापक प्रशांत भुसारी ह्यांनी सांगितले की, ‘मनपा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय ह्यांनी दिलेल्या सूचनेनुसार उद्यापासून कोणालाही स्मार्ट सिटी बसेस मध्ये विना मास्क प्रवेश करता येणार नाही. आणि बस मध्ये बसून ज्यांनी मास्क काढला त्यांचावर कार्यवाही करण्यात येईल’.
दरम्यान, कोरोना संसर्गाच्या प्रतिबंधासाठीच्या विविध उपाययोजना स्मार्ट सिटी बस प्रशासनाच्या वतीने राबवल्या जात आहेत. प्रत्येक फेरीच्यानंतर बसचे निर्जंतुकीकरण केले जाते. बसमध्ये डिजिटल डिस्प्ले आणि उद्घोषणांचा उपयोग करून प्रवाशांना सूचना दिल्या जात आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- पुणे, पिंपरी चिंचवडसह ग्रामीण भागात 36 हजार थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित
- ‘कसोटीगिरी’ साठी नावाजलेल्या पुजाराचं तब्बल ७ वर्षांनी आयपीएलमध्ये पुनरागमन !
- सरकार कोणालाच घाबरत नाही, आम्ही केलेली काम अधिवेशनात ठामपणे मांडू : अनिल परब
- तीन वर्षांची प्रतीक्षा ! शिवप्रेमींना मनपाची अशीही शिक्षा
- पंजाबने ५.२५ कोटी रुपयांची बोली लावलेला शाहरूख खान कोण आहे?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

