🕒 1 min read
औरंगाबादः संभाजीनगरचा मुद्दा पुन्हा एकदा गाजण्यास सुरुवात झाली आहे. औरंगाबाद पालिका निवडणूका जवळ आलेल्या असल्याने शिवसेना-भाजप-मनसेकडून हा मुद्दा तापवला जात आहे. तर तिथेच शहरातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस मात्र वेळोवेळी संभाजीनगरला आपला विरोध दर्शवत आहे. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असली तरीही शहरातील समीकरणे मात्र त्यापेक्षा कित्येक पटींनी वेगळी आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीने शहराचे नाव औरंगाबादच राहील, अशी भूमिका घेतली आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शहराचे नाव संभाजीनगर ठेवले. तेव्हापासून आजतागायत शिवसेनेने शहराचा उल्लेख संभाजीनगर असाच केला आहे. शिवसेनेने पदाधिकारी, कार्यकर्ते, नेतेमंडळीही संभाजीनगर असाच उल्लेख करणे पसंत करतात. मात्र राज्यातील राजकारणाची समीकरणे बदलली आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीचा संभाजीनगरला पूर्णपणे विरोध आहे. मात्र काही दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत महाविकास आघाडीने शहराचे नाव संभाजीनगर करण्याचा ठराव एकमताने मंजूर करून शासनाला पाठवला. या ठरावानंतर औरंगाबाद शहर व जिल्ह्यातील राजकारण पुन्हा एकदा तापले आहे.
या ठरावामुळे जिल्हाध्यक्ष डॉ. कल्याण काळे अडचणीत आले असल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष ख्वाजा शरफोद्दीन यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, शहराचे नाव कुणीही काहीही घेतल्याने काही फरक पडत नाही. आमच्या नेत्यांनी या प्रकरणी न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे. सर्वोच्च न्यायालयातही हे प्रकरण प्रलंबित आहे. कुणी कितीही प्रयत्न केले तरी औरंगाबाद हेच नाव राहील. तर काँग्रेसचे शहराध्यक्ष हिशाम उस्मानी म्हणाले, इतिहास बदलण्याचा प्रयत्न कुणीही करून नये, संभाजीनगरला तर काँग्रेसचा विरोध आहेच. मात्र त्याशिवाय देशातील इतर कोणत्याही शहरांची नावे बदलण्याची आमचा विरोध असेल असेही ते म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
- लेखिका पद्मा लक्ष्मीने शेअर केला ‘नान बेडशीट’चा फोटो, नेटकरी म्हणाले..’सकाळी उठल्याबरोबर..’
- एसटी संपाची महिनापूर्ती; औरंगाबादेत महिनाभरात ३६ कर्मचारी निलंबित, २८ चालक-वाहक रुजू
- मोठी बातमी! हेलिकॉप्टर अपघातात आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू
- औरंगाबादेत जिल्हाधिकारी, आयुक्तांची रस्त्यावर उतरुन जनजागृती
- बाजार समितीच्या विरोधात राष्ट्रवादीला हाताशी धरुन भाजपच्या तक्रारी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
