मुंबई : देशात गेल्या दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधीपासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावर पॉप स्टार रिहाना, पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग यांनी केलेल्या वक्तव्यावर परराष्ट्र मंत्रालयानं नाराजी व्यक्त केली. शेतकरी आंदोलनाबाबत कोणत्याही प्रकारची टीका किंवा ट्वीट करण्यापूर्वी त्या प्रकरणाचं सत्य जाणून घेणं आवश्यक असल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी ट्वीट करत नाराजी व्यक्त केली. यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीदेखील त्यांच्या ट्वीटवर रिप्लाय देत कोणत्याही प्रकारचा दुष्प्रचार देशाचं ऐक्य तोडू शकत नसल्याचं म्हटलं.
“कोणताही दुष्प्रचार देशाचं ऐक्य तोडू शकत नाही. कोणताही दुष्प्रचार भारताला विकासाची उची गाठण्यापासून रोखू शकत नाही, दुष्प्रचार हा भारताचं भवितव्य ठरवू शकत नाही केवळ विकास ते ठरवू शकतो. भारत एकसंध आहे आणि एकसंध राहूनच विकासकडे वाटचाल करेल,” असं ट्वीट अमित शाह यांनी केलं. यापूर्वी पॉप सिंगर रिहाना आणि ग्रेटा थनबर्ग यांनी भारतात सुरू असलेल्या कृषी आंदोलनावर वक्तव्य केलं होतं. त्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाकडून त्यावर उत्तरही देण्यात आलं होतं.
No propaganda can deter India’s unity!
No propaganda can stop India to attain new heights!
Propaganda can not decide India’s fate only ‘Progress’ can.
India stands united and together to achieve progress.#IndiaAgainstPropaganda#IndiaTogether https://t.co/ZJXYzGieCt
— Amit Shah (@AmitShah) February 3, 2021
महत्वाच्या बातम्या
- ‘महाराष्ट्र देशा’चा इम्पॅक्ट, बातमीनंतर जलवाहिनीच्या कामाची रक्कम भरली
- रिहानाच्या ट्विटवर राहुल गांधींनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया, दिल्लीतील फौजफाट्यावरून मोदींवर टीका
- प्यायचे होते पाणी, पण चुकून प्यायले सॅनिटायझर; BMCचे सहआयुक्त रमेश पवारांकडून घडली चूक
- शरजील उस्मानीवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी चंद्रकांत पाटलांचे थेट योगींना पत्र
- ‘एखाद्या पराक्रमी योद्ध्याप्रमाणे मुंडेंचं स्वागत होतंय, त्यांचं स्वागत करणाऱ्यांची मानसिकता तपासायला हवी’

