Share

शासनाच्या परवानगीशिवाय कोणतीही पालखी किंवा दिंडी निघणार नाही

Published On: 

🕒 1 min read

पुणे : सध्या कोरोना (कोविड-19) विषाणू संसर्गजन्य परिस्थिती आहे. पुणे, सातारा आणि सोलापूर हे तीन जिल्हे रेड झोनमध्ये आहेत. ही परिस्थितीही विचारात घेवून आषाढी वारी पालखी सोहळा योग्य त्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांसह पार पाडला जावा, अशीच प्रत्येकाची भावना आहे. परंपरेप्रमाणे पालखी सोहळ्यात कोणताही खंड न पडता शासकीय नियमांचे पालन झाले पाहिजे यासाठी कोरोनाची स्थिती पाहून 30 मे नंतर वारकरी संप्रदायातील मान्यवरांशी चर्चा करून आषाढी वारी पालखी सोहळ्याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. शासनाच्या परवानगीशिवाय कोणतीही पालखी किंवा दिंडी काढू नये, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

आषाढी वारी सोहळ्याच्या आयोजनाबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आमदार सुनील शेळके, माजी आमदार उल्हास पवार, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, संदीप बिष्णोई, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, निवासी उप जिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती, पंढरपूरचे सदस्य सचिव विठ्ठल जोशी, श्री क्षेत्र आळंदी येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे राजाभाऊ चोपदार, ॲड. विकास ढगे पाटील, अभय टिळक, श्री क्षेत्र देहूच्या श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे मधुकर महाराज मोरे, विशाल मोरे, सासवड येथील श्री संत सोपानदेव समाधी मंदिर ट्रस्टचे विश्वस्त तथा अध्यक्ष गोपाळ गोसावी, श्रीकांत गोसावी, मनोज रणवरे यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित केली होती. सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्हिडीओ कॉन्फरसिंगव्दारे बैठकीत सहभाग घेतला.

# Lockdown 4 : देशात उद्यापासून नवा लॉकडाउन, जाणून घ्या कसा असेल चौथा टप्पा?

आषाढी यात्रा ही सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे ‘महायात्रा’ म्हणूनही ओळखली जाते. या वर्षी म्हणजे 2020 मध्ये ही यात्रा बुधवार 1 जुलै, 2020 रोजी भरणार आहे. या दिवशी पहाटे 2.20 वाजता राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सपत्नीक श्रींची शासकीय महापूजा करणार आहेत. आषाढी यात्रा कालावधी हा आषाढ शुद्ध 1 (दिनांक 22 जून 2020) ते आषाढ शुद्ध 15 (दिनांक 5 जुलै 2020) असा राहणार आहे.

सध्या जगभरामध्ये कोरोना आजाराने थैमान घातले आहे. पुण्यामध्येही कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. अशा परिस्थितीत या भागातून पंढरपूरमध्ये वारकरी पायी चालत येणे हे पालखी मुक्कामाच्या ठिकाणी व पंढरपूरमध्ये संसर्गाचा मोठा धोका निर्माण करणारे ठरु शकते. यात्रेनिमित्त मोठ्या संख्येने भाविक एकत्र आल्यास सामूहिक संसर्गाचा धोका आहे. संसर्ग झालेले भाविक, वारकरी त्यांच्या भागामध्ये परत गेल्यानंतर त्या भागातही कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. या व्यतिरिक्त बुक्का विक्री, मूर्ती विक्रेते, हार-फूल विक्रेते, तंबोरे, टाळ,वीणा व फोटो विक्रेते यांच्यासारखे अनेक लहान-मोठे व्यावसायिक यात्रा काळात पंढरपूरमध्ये येत असतात. या जनसमुदायांमध्ये सामाजिक अंतर (सोशल डिस्टन्स) राखणे शक्य होणार नाही. तसेच सध्या पोलीस यंत्रणा, आरोग्य यंत्रणा कोरोनाच्या मुकाबल्यामध्ये व्यस्त आहेत. या सर्व गोष्टींचा सर्वंकष विचार करुन आषाढी वारी पालखी सोहळ्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.

यंदा ‘सीईटी’ नको ; संस्थाचालक, प्राचार्याची मागणी

कोरोनाचे संकट नसते तर प्रदीर्घ परंपरा असलेला हा आषाढी वारी पालखी सोहळा नेहमीच्या उत्साहात आणि भक्तीपूर्ण वातावरणात संपन्न झाला असता. या पालखी सोहळ्याबाबतची माहिती.

पंढरपूर मंदिरे अधिनियम, १९७३ च्या तरतुदीनुसार पंढरपूर येथील श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिराचा कारभार पंढरपूरच्या श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समिती, पंढरपूरकडे शासनामार्फत सोपवण्यात आलेला आहे. या अधिनियमानुसार श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीकडे या मंदिराचे संपूर्ण व्यवस्थापन आलेले आहे.

मजुरांसाठी मुंबई-पुण्याहून परगावी जाण्यासाठी विशेष रेल्वे गाड्या सोडा : अजित पवार

श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीकडे श्री विठ्ठल रूक्मिणीचे पंढरपूरातील मुख्य मंदिर आणि मंदिरातील ३६ परिवार देवता तसेच पंढरपूर शहर व परिसरातील २८ परिवार देवता यांचे व्यवस्थापन करण्याचे कामकाज आहे. या सर्व देव-देवतांची पूजा-अर्चा इत्यादी दररोजचे नित्योपचार, नैमित्तिक उपचार मंदिरात व मंदिराबाहेरील परिवार देवतांच्या मंदिरात साजरे करण्यात येणारे यात्रा व उत्सव, वर्षातून चार वेळा येणाऱ्या आषाढी, कार्तिकी, माघी व चैत्री या चार मोठ्या यात्रा कालावधीत भाविकांची गर्दी मोठया प्रमाणात असते. श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर हे ‘दक्षिण काशी’ म्हणूनही ओळखले जाते. लाखो वारकऱ्यांच्या श्रध्देचे स्थान व उभ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या या दैवताच्या दर्शनासाठी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, तेलंगना या राज्यातून व देशभरातून वर्षभरात अंदाजे १ कोटीपेक्षा जास्त भाविक भेटी देतात. या यात्रा कालावधीत अंदाजे १५ लाख भाविक पंढरपूर दर्शनासाठी येतात.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!