🕒 1 min read
धुळे : शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला करोना आहे अशी जहरी टीका भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बहुजन समाजावर अन्याय केल्याचा आरोपही गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. शरद पवार धनगर समाजाच्या आरक्षणासंबंधी सकारात्मक नसून फक्त राजकारण करत आहेत असंही त्यांनी म्हटलं आहे. गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे.
धक्कादायक ! महाराष्ट्रात गेल्या २४ तासात ५ हजार २४ करोना रुग्णांची भर
शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला करोना आहे असं माझं मत आहे. गेल्या अनेक वर्षात महाराष्ट्राचं नेतृत्त्व ते करत आहेत. राज्यातील बहुजनांवर अत्याचार करण्याची त्यांची भूमिका कायम राहिली आहे. ती ते पुढंही चालू ठेवतील. त्यांच्याकडे कोणतीही विचारधारा, अजेंडा, व्हिजन नाही. फक्त छोट्या समूह घटकांना भडकवून आपल्या बाजूने करुन घ्यायचं आणि नंतर त्यांच्यावरच अन्याय करायचे त्यांची भूमिका आहे असं पडळकर म्हणाले आहेत.
यावर “राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे वय, अनुभव आणि राजकीय कारकिर्दीसमोर गोपीचंद पडळकर डासाएवढेही नाहीत. डास मारायला कुणी बंदूक वापरत नाही. एक हिटचा फवारा काफी असतो”, असा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि धुळ्याचे माजी आमदार अनिल गोटे यांनी केला.
भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेवर अनिल गोटे यांनी परिपत्रक जारी करत भाजप नेत्यांवर निशाणा साधला. या परिपत्रकात त्यांनी गोपीचंद पडळकर यांच्यासोबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरही सडकून टीका केली.
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा राज्यकारभार आजही मार्गदर्शक- मुख्यमंत्री
“पडळकरांचा निषेध करावा एवढे मोठे त्यांचे व्यक्तिमत्व नाही. पण घृणास्पद निश्चितच आहे. त्यांना आमदार होवून जुम्मे-जम्मे आठ दिवस झाले. पडळकर नव्या नवरीचा आनंद उपभोगत आहेत. नवरी रुळल्यावर त्यांना झटके बसतील. त्यावेळेला त्यांच्याबाजूला स्वत:ची सावलीसुद्धा राहणार नाही”, अशी टीका अनिल गोटे यांनी केली.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
