Share

धक्कादायक ! महाराष्ट्रात गेल्या २४ तासात ५ हजार २४ करोना रुग्णांची भर

Published On: 

मुंबई : राज्यात आज कोरोनाच्या ५०२४ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ६५ हजार ८२९ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत.आज २३६२ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून एकूण संख्या ७९ हजार ८१५ झाली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ५२.२५ टक्के एवढे झाले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ८ लाख ७१ हजार ८७५ नमुन्यांपैकी १ लाख ५२ हजार ७६५ नमुने पॉझिटिव्ह (१७.५२ टक्के) आले आहेत. राज्यात ५ लाख ५८ हजार ४८८ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३६ हजार ९०३ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा राज्यकारभार आजही मार्गदर्शक- मुख्यमंत्री

राज्यात आज १७५ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. यापैकी ९१ मृत्यू मागील ४८ तासांमधील तर उर्वरित ८४ मृत्यू मागील कालावधीतील आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर ४.६५ टक्के एवढा आहे.

मागील ४८ तासात झालेले ९१ मृत्यू हे मुंबई मनपा-४४, कल्याण-डोंबिवली मनपा-२, नाशिक-१. नाशिक मनपा-७, पुणे मनपा-१४, कोल्हापूर-१, औरंगाबाद मनपा-१४, लातूर-२, नांदेड मनपा-२, अकोला-१, अकोला मनपा-१, नागपूर मनपा-१, गोंदिया-१ या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील आहे.

पुणे शहरासह जिल्ह्यात ‘मुंबई पॅटर्न’ राबवा – आरोग्य मंत्री राजेश टोपे

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!