औरंगाबाद : छत्रपती शिवाजी महाराज यांची तारखेनुसारची जयंती ही १९ फेब्रुवारी रोजी साजरी केली जाते. राज्यभरात विविध उपक्रमांसह मर्दानी खेळ, मिरवणुका, ढोल ताशांच्या गजरात ही शिवजयंती साजरी केली जाते. फक्त देशात वा राज्यातच नाही तर गेल्या काही वर्षांमध्ये शिवजयंती परदेशात देखील उत्साहात साजरी केली जाते.
मात्र, यंदा शिवजयंती साजरी करण्यावर कोरोनाचं सावट कायम आहे. कोरोना आटोक्यात आला असला तरी शिवजयंतीसाठी निर्बंध लावण्यात आले असल्याने शिवभक्तांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अनेक ठिकाणी याआधीच शिवभक्तांकडून आयोजनाची तयारी करण्यात आली होती मात्र ऐनवेळी गृहविभागानं आदेश बजावून शिवजयंती साजरी करण्यावर निर्बंध घातल्यामुळे अवघ्या महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे.
भाजप, मनसेसह शिवभक्तांनी महाविकास आघाडीला लक्ष्य केल्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुन्हा भाष्य केलं आहे. ‘शिवजयंती साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला, तर काही जणांनी शिवजयंतीला बंधन का आणता अशी टीका केली. पण कोरोना वाढतोय, त्यामुळे हा निर्णय घ्यावा लागला. या विषयावर राजकारण करून लोकांना कुणीही भावनिक करू नये,’ असं अजित पवार म्हणाले आहेत. औरंगाबाद दौऱ्यावेळी पत्रकार परिषद घेऊन अजित पवारांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं.
महत्वाच्या बातम्या
- मी माजी पंतप्रधानांचा मुलगा असलो तरी तत्वासाठीची लढाई सोडून देणार नाही
- कोरोनाचा संसर्ग वाढतोय ! अजित पवारांनी दिले कठोर पाऊल उचलण्याचे संकेत
- ‘पडळकरांचं वय किती पवारसाहेबांचा अनुभव किती’
- चक्क कॉंग्रेस मंत्र्यांकडून मोदी सरकारचे कौतुक
- …यावर मी गडकरी यांच्या मताशी सहमत: अशोक चव्हाण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
