Share

राज कुंद्राला कोर्टाकडून दिलासा; अटकपूर्व जामीन अर्जावर ‘या’ दिवशी होणार सुनावणी

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : उद्योजक राज कुंद्राला अश्लिल व्हिडीओ प्रकरणात काही दिवसापुर्वी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. सध्या या प्रकरणी त्याची चौकशी करण्यात येत असून याबाबत नवनवीन माहिती समोर येत आहे. त्यानंतर आता या प्रकरणाचा अधिक तपास होण्यासाठी एसआयटीची स्थापना केली आहे. मात्र सध्या मुंबई उच्च न्यायालयाने राज कुंद्राचा अटकपूर्व जामीन अर्ज २५ ऑगस्टपर्यंत सुनावणीसाठी राखून  ठेवल्याने त्याला काहीसा दिलासा  मिळाला आहे.

काही दिवसांपूर्वीच मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने एसआयटीची स्थापना केली. ही टीम फक्त पोर्नोग्राफी रॅकेटशी संबंधितच तपास करणार आहे. या एसआयटीचे नेतृत्व एसीपी दर्जाचा अधिकारी करणार आहे. ही टीम गुन्हे अन्वेषण विभागाची वरिष्ठ अधिका-यांना अहवाल सादर करणार आहेत. याप्रकरणाचा तपास आता मुंबई पोलिसांच्या गुन्हे विभागाच्या प्रॉपर्टी विभागाकडे आहे. या प्रकरणामध्ये राज कुंद्रा हा मुख्य आरोपी असल्याचे मानले जात आहे.

दरम्यान, याच प्रकरणाशी संबंधित अभिनेत्री शर्लिन चोप्रा देखील चर्चेत होती. शर्लिनने राजवर या प्रकरणानंतर गंभीर आरोप देखील केले होते आता नुकताच मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई क्राईम ब्रँच पुन्हा एकदा अभिनेत्री शर्लिन चोप्राची चौकशी करणार आहेत. त्यासाठी मुंबई पोलिसांनी शर्लिनला समन्ससुद्धा पाठवला आहे. तसेच याप्रकरणी राज कुंद्राची पत्नी अभिनेत्री शिल्पाची देखील चौकशी करण्यात आली होती.

महत्त्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!