पुणे- कोविडवर लस निर्माण करण्यासाठी भारतात अत्यंत वेगाने काम सुरू आहे अशी माहिती अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे संचालक रणदीप गुलेरिया यांनी आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत दिली. लशीची मानवी चाचणी दोन टप्प्यात केली जाणार असून सुमारे तीन महिन्यात ती पूर्ण होईल असं ते म्हणाले. आकाशवाणीने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
देशात आतापर्यंत कोविड 19 आजारातून बरे झालेल्या व्यक्तींची एकंदर संख्या 7 लाख 87 इतकी झाली आहे. देशातला रुग्ण बरे होण्याचा सरासरी दर आता 62 पूर्णांक 61 शतांश टक्के झाला आहे. गेल्या 24 तासात देशभरात 40 हजार 425 नवे कोरोनाबाधित आढळले असून कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यापासून एकाच दिवसात एवढे कोविड रुग्ण आढळण्याची ही आतापर्यंतची सर्वाधिक संख्या आहे.
देशात आतापर्यंत कोरोनाबाधित झालेल्या व्यक्तींची एकंदर संख्या 11 लाख 18 हजार 43 इतकी झाली आहे. काल दिवसभरात 6 शे 81 रुग्णांचा मृत्यू झाल्यामुळे कोविडमुळे दगावलेल्या व्यक्तींची एकंदर संख्या आता 27 हजार 497 वर पोहोचली आहे.
महत्वाच्या बातम्या-
जयंत पाटील हा अत्यंत तज्ञ, बुद्धिवान आणि पंडित माणूस, पडळकरांचा जोरदार टोला
मी मुख्यमंत्र्यांवर टीका केली नाही केवळ सल्ला दिला, पृथ्वीराज चव्हाणांनी दिले स्पष्टीकरण
‘मला ३५ कोटी रुपयांची ऑफर दिली होती,मात्र तरीही मी कॉंग्रेस सोडली नाही’
…तर विरोधकांनी काहीही न खाता-पिता मोदी सरकार एव्हाना पाडलं असतं – सुधीर मुनगंटीवार
गणेशोत्सव: चाकरमान्यांसाठी दिलासा, एसटीने कोकणात जाण्यास सशर्त परवानगी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

