🕒 1 min read
पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची गुढीपाडवा सभेनंतर आता पुण्यात चौथी सभा आज रविवार सकाळी १० वाजता पुण्यात सभा होणार आहे. मुंबईत गुढीपाडवासभेनंतर राज ठाकरे यांची ठाणे आणि औरंगाबाबत येथे सभा झाली. परंतु आज पुण्यात होणाऱ्या सभेला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. राज ठाकरे यांनी आपला अयोध्या दौरा स्थगित केल्याचे जाहीर केले. आता राज ठाकरे यांच्या पुण्यातल्या सभेला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. राज ठाकरे आज काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान राज ठाकरे यांच्या मुख्य भाषणापूर्वी मनसे प्रवक्ते गजानन काळे बोलले. यावेळी त्यांनी शिवसेना तसेच महाविकासआघाडी सरकारवर जोरदार टीका केली. गजानन काळे यांनी धर्मवीर चित्रपटाचा दाखला देत हिंदुत्व मुद्द्यावर उद्धव ठाकरेंवर टीका केली. धर्मवीर चित्रपटात एका प्रसंगाचा उल्लेख काळे यांनी केला. चित्रपटातील एका दृश्यात आनंद दिघे यांना भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये जातात. तेव्हा आनंद दिघे म्हणतात की, “राजसाहेब हिंदुत्वाची जबाबदारी तुमच्यावर आहे. ” या दृश्याचा दाखला देत आता आम्हाला बाळासाहेब ठाकरे फक्त राज ठाकरेंमध्ये दिसतात, असे गजानन काळे म्हणाले.
मुंबईत गुढीपाडवासभेनंतर राज ठाकरे यांची ठाणे आणि औरंगाबाबत येथे सभा झाली. राज ठाकरे यांनी पाच जूनला अयोध्या दौरा करणार असल्याचे जाहीर केले होते, पण यानंतर उत्तर प्रदेशमधून भाजप खासदार बृजभूषण सिंग यांनी उत्तर भारतीयांची माफी मागितल्याशिवाय उत्तर प्रदेश मध्ये राज ठाकरे यांना पाय ही ठेवू देणार नाही, म्हणत जोरदार विरोध केला. यानंतर राज ठाकरे यांनी आपला अयोध्या दौरा स्थगित केल्याचे जाहीर केले. आता या सर्व पार्श्वभूमीवर राज ठाकरे आज काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्त्वाच्या बातम्या :

