Share

‘कोरोना विषाणूचा एकही संशयीत रुग्ण महाराष्ट्रात नाही’

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : कोरोना विषाणूंमुळे २५ जणांचा मृत्यु,तर ८३० जणांना या विषाणूंची लागण झाल्याची कबुली चीनच्या आरोग्य विभागानं दिली आहे. २९ प्रांतीय विभागात या विषाणूंचा प्रादुर्भाव झाल्याचं सांगितलं जात आहे. या विभागात १ हजार ७२ नवीन लोकांना या विषाणूंची बाधा झाल्याचा संशय आहे, अशी माहिती आरोग्य विभागानं दिली आहे.

याच पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी भाष्य केलं आहे. मुंबई येथे पत्रकारांनी त्यांनी ‘कोरोना’बाबत विचारलं असता. यावेळी बोलताना ते म्हणाले की, ‘चीनमध्ये लागण झालेल्या कोरोना विषाणूचा संसर्ग झालेला एकही रुग्ण महाराष्ट्रात नसल्याची माहिती टोपे यांनी यावेळी बोलताना दिली.

तसेच पुढे बोलताना ते म्हणाले, ‘तपासणी केलेल्या प्रवाशांपैकी मुंबईतील 2 प्रवाशांना घरी गेल्यानंतर सौम्य सर्दी आणि तापाची लक्षणे आढळून आली. त्यामुळे त्यांना कस्तुरबा रुग्णालयात निरीक्षणाखाली ठेवण्यात आलं आहे, अशीही माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

दरम्यान, राज्यातील ज्या नागरिकांनी गेल्या 14 दिवसांमध्ये चीनच्या वुहान प्रांतात प्रवास केला असेल अशा नागरिकांना सर्दी, ताप जाणवत असेल, तर त्यांनी जवळच्या शासकीय रुग्णालयात जाऊन तपासणी करावी, असे आवाहन आरोग्यमंत्री टोपे यांनी यावेळी बोलताना केले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!