नागपूर : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरुपदी स्वयंसेवक कसा काय नेमला, असा प्रश्न राज्याचे ऊर्जामंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांना विचारला आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना असे व्हायला नको होते, असेही डॉ. राऊत मुख्यमंत्र्यांना म्हणाले.
राज्यपालांनी अधिकाराचा दुरुपयोग केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. अलीकडेच नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. सुभाष चौधरी यांची नियुक्ती राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केली. डॉ. चौधरी यांनी नियुक्ती होताच केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्यासह भाजप नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या. त्यांचे आभारही मानले. हीच बाब महाआघाडीच्या नेत्यांना खटकली. शैक्षणिक क्षेत्रामध्ये राजकारण येऊ नये, याकरिता राज्य शासनाने कुलगुरूंची नेमणूक करण्याचे अधिकार राज्यपालांना दिले आहेत. याचाच फायदा कोश्यारी यांनी घेतला. या पदावर संघ वर्तुळातील स्वयंसेवकाची त्यांनी नेमणूक केली. राज्यात महाआघाडीचे सरकार आहे. मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री, तंत्र शिक्षणमंत्री आघाडीत सहभागी असलेल्या घटकपक्षांचे आहेत. त्यामुळे कुलगुरुपदी नियुक्ती
करताना मुख्यमंत्र्यांचे मत घेण्याचेही सौजन्य राज्यपालांनी दाखवले नाही, असा आरोप मंत्रिमंडळाच्या बैठकीत नितीन राऊत यांनी केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेतले, मात्र त्यांनी या विषयावर तत्काळ प्रतिक्रिया व्यक्त केली नसल्याचे समजते.
यशवंत माने यांच्या जातीचा दाखला बोगस शिवसेनेचा सनसनाटी आरोप
नागपूरच्या कुलगुरुपदासाठी १३४ उमेदवारांनी अर्ज केले होते. त्यातून ३० जणांची मुलाखतीसाठी निवड करण्यात आली होती. यातून अंतिम पाच जणांची निवड करून त्यांची राज्यपालांनी प्रत्यक्ष मुलाखत घेतली होती. यात डॉ. विनायक देशपांडे, इंस्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीचे डॉ. सुनील भागवत, नांदेडचे डॉ. गणेशचंद्र शिंदे, नॉर्वेचे डॉ. मोहनलाल कोल्हे यांचा यात समावेश होता. विद्यमान कुलगुरू डॉ. चौधरी यांच्या पेक्षा इतर उमेदवारांचा अनुभव आणि शैक्षणिक पात्रता अधिक होती. भागवत आणि कोल्हे यांचे नाव यात आघाडीवर होते.
शैक्षणिक क्षेत्रात राजकारण आणू नये, अशीच भूमिका आपली आहे. मात्र नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरूंची नियुक्ती करताना राज्यपालांनी ‘विशेष’ संघटनेचा विचार त्याकरिता अधिकाराचा दुरुपयोग त्यामुळे आपण थेट मुख्यमंत्र्यांना विचारणा केली. मुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेतील. असे नितीन राऊत म्हणाले.
दूध दरवाढ आंदोलन प्रकरणी राजू शेट्टींसह ४० जणांवर गुन्हा दाखल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

