Share

दूध दरवाढ आंदोलन प्रकरणी राजू शेट्टींसह ४० जणांवर गुन्हा दाखल

Published On: 

बारामती : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी राज्यात ठीक-ठिकाणी आंदोलन पुकारत आहे.राजू शेट्टींनी काल बारामतीत दूध दरवाढीसाठी राज्य सरकारविरोधात एल्गार पुकारला. राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात बारामती नगरपरिषद ते प्रांत कार्यालय असा मोर्चा निघाला होता.

यावेळी त्यांनी “आता आक्रमक व्हा, मंत्री आला की दुधाने आंघोळ घाला”, असं आवाहन शेतकऱ्यांना केलं.राजू शेट्टी बारामतीत दाखल होताच कार्यकर्त्यांनी वाजत गाजत त्यांचं स्वागत केलं होत. मोर्चात सहभागी झालेले शेतकरी आपल्यासोबत जनावरांनाही घेऊन आले होते. यावेळी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.गोमूत्राची किंमत 110 रुपये लिटर पण आमच्या दुधाला किंमत नाही. असा घणाघात राजू शेट्टी यांनी केला.

वर्ध्याचे आमदार डॉ. पंकज भोयर यांना उपचारासाठी मुंबईला हलविले

राजू शेट्टी यांनी काढलेल्या मोर्चात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. परंतु, या मोर्चात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन केले नाही. तोंडाला मास्क लावले नव्हते. मोर्चाला परवानगी नाकारली असताना देखील बेकायदा जमाव जमवून घोषणाबाजी आणि भाषणे झाली.

राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदाराचा जातीचा दाखला खोटा, शिवसेना नेत्यानेच केला आरोप

त्यामुळे कोरोना काळ असून देखील जमावाच्या आरोग्याला बाधा होईल, असं कृत्य केल्याची फिर्याद पोलीस कर्मचारी ओंकार सिताप यांनी दिली. त्यावरुन आज बारामती शहर पोलीस ठाण्यात माजी खासदार राजू शेट्टी आणि त्यांच्या अन्य 40 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिल्ली सरकारने भ्रष्टाचार केलाय तर आपले केंद्रातले सरकार कारवाई का करत नाही? अण्णांनी ‘ते’ निमंत्रण नाकारले

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!