Share

यशवंत माने यांच्या जातीचा दाखला बोगस शिवसेनेचा सनसनाटी आरोप

Published On: 

सोलापूर : सोलापूरचे खा. डॉ. जय सिद्धेश्वर महास्वामी यांच्या नंतर आता मोहोळ विधानसभा मतदार संघाचे आमदार तथा विधानसभा पक्षप्रतोद यशवंत माने यांच्या जातीचा दाखला बोगस असल्याचा सनसनाटी आरोप शिवसेना युवा नेते सोमेश क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेत केला.

अनुसूचित जातीसाठी आरक्षित असलेल्या मोहोळ विधानसभा मतदार आमदार यशवंत यांनी सादर केलेला हिंदू कैकाडी हा अनुसूचित जातीचा दाखला बोगस असल्याचे सांगितले. हा दाखला बुलडाणा जिल्ह्यातील चिखली तहसील कार्यालयात बनावट कागदपत्रे सादर करून त्यांनी हा दाखला मिळविला असल्याचेही क्षीरसागर यांनी सांगितले. आमदार यशवंत माने यांनी यापूर्वी विमुक्त जातीच्या आरक्षणाचा लाभ घेतला असून एकाच व्यक्तीने दोन जातीचा लाभ घेतल्या आरोप करुन त्याबाबतचे पुरावे देखील त्यांनी आज पत्रकार परिषदेत सादर केले.

खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांचे बनावट जातीचा दाखला प्रकरण असतानाच आता अनुसूचित जातीसाठी आरक्षित असलेल्या मोहोळ विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादीचे आमदार यशवंत माने यांच्या जातीच्या दाखल्याचा मुद्दा पुढे आला आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष सध्या राज्यात सत्तेत आहेत. आमदार माने हे राष्ट्रवादीचे आमदार आहेत तर तक्रारदार सोमेश क्षीरसागर हे शिवसेना उमेदवार नागनाथ क्षीरसागर यांचे चिरंजीव आहेत. त्यामुळे ऐन पावसाळ्यात पेटलेल्या मोहोळच्या राजकारणाच्या झळा महाविकास आघाडीच्या सत्तेपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

दूध दरवाढ आंदोलन प्रकरणी राजू शेट्टींसह ४० जणांवर गुन्हा दाखल

यासंदर्भात सोमेश क्षीरसागर यांनी सर्व कागदपत्रे आणि पुराव्यांच्या आधारे बुलडाणा येथील जिल्हा जात पडताळणी समितीकडे तक्रार केली आहे. तर मोहोळ पोलिसात आमदार माने यांनी जातीचा बनावट दाखला सादर करून फसवणूक केल्याचा तक्रारी अर्ज देखील दिला आहे. या तक्रारीची एक प्रत त्यांनी सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनाही दिली आहे. या बाबत अधिक माहिती देताना क्षीरसागर यांनी सांगितले की, ‘महाराष्ट्रातील आठ जिल्ह्यांमधीलच हिंदू कैकाडी या जातीचा समावेश अनुसूचित जातीमध्ये करण्यात आला आहे. राज्यातील उर्वरित जिल्ह्यातील कैकाडी समाज हा विमुक्त जाती संवर्गात आहे. आमदार यशवंत माने गेल्या चार पिढ्यांपासून इंदापूर तालुक्यातील शेळगावमध्ये वास्तव्यास आहेत. शेळगावमधील जमिनीचे गेल्या शंभर वर्षांपासूनचे त्यांच्या शेतमालकीचा सातबारा उतारा व फेरफार आहेत. तसेच आमदार यशवंत माने व त्यांचे बंधू हणमंत माने या दोघांनी शिक्षणासाठी विमुक्त जातीसाठी असलेले लाभ घेतल्याचे पुरावे आहेत. या दाखल्याची नोंद आजही इंदापूर तहसील कार्यालयात आहेत.

आमदार यशवंत माने यांनी २००८ मध्ये बुलढाण्याच्या प्रांताधिकाऱ्यांकडून हिंदू कैकाडी अनुसूचित जातीचा दाखला मिळविला आहे. शिवाय त्यांनी इंदापूर तालुक्यातील शेळगाव येथील महात्मा ज्योतिबा फुले माध्यमिक विद्यालयात लिपिक पदावर नोकरीस असल्याचे भासवून या दाखल्याची पडताळणी करण्यास पाठविली होती. त्यानंतर त्यांच्या या बनावट दाखल्याची जात वैधताही झाली आहे. मात्र ही शाळा सध्या अस्तित्वातच नसल्याचे सांगत क्षीरसागर यांनी खळबळ उडवून दिली.

या संदर्भात प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी मोहोळचे आमदार यशवंत माने यांना संपर्क केला असता, ते उपलब्ध होऊ शकले नाहीत. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरण्याची लागण झाल्याने ते सध्या पुणे येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. उपचार आतून बरे होऊन आल्यानंतरच या प्रकरणाची दुसरी बाजू समोर येऊ शकते.

आमदार माने यांनी त्यांचा मुलगा तेजस याच्या जातीच्या दाखल्यासाठी प्रयत्न केला आहे. मात्र चिखली जि. बुलढाणा तहसीलदारांनी त्यांची वंशावळ जुळत नसल्याचा शेरा मारला आहे. मात्र त्याबाबतचे पुरावे क्षीरसागर यांच्याकडे नाहीत.

दिल्ली सरकारने भ्रष्टाचार केलाय तर आपले केंद्रातले सरकार कारवाई का करत नाही? अण्णांनी ‘ते’ निमंत्रण नाकारले

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!