Share

राज ठाकरेंची टीका गडकरींना झोंबली;‘कृष्णकुंज’वर पाठवली रस्ते विकास कामांची यादी

Published On: 

मुंबई: गुढीपाडव्याला मुंबईत शिवाजी पार्कमध्ये झालेल्या जाहीर भाषणात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजप नेते नितीन गडकरी यांच्यावर केलेली टीका गडकरींना चांगलीच झोंबली आहे. राज ठाकरेंना त्यांच्या निवासस्थानी म्हणजेच ‘कृष्णकुंज’वर राज्यात केलेल्या रस्ते विकास कामांची एक यादीच पाठवली आहे.

मनसेच्या गुढीपाडव्याच्या मेळाव्यात राज ठाकरेंनी नितीन गडकरींची खिल्ली उडवली होती. शिवाय गडकरी फक्त घोषणा करतात, कामं करत नाही, असा आरोप केला होता. त्याला आता गडकरींनी लेखी उत्तर पाठवलं.आतापर्यंत मी ज्या ज्या प्रकल्पांच्या घोषणा केल्या, त्याची कागदपत्र सभेच्या दुसऱ्याच दिवशी राज ठाकरेंना पाठवण्याल्याचं नितीन गडकरींनी सांगितलं. याबाबतचा 25 पानी सविस्तर अहवाल गडकरींनी राज ठाकरेंना पाठवला.यामध्ये महाराष्ट्रात आतापर्यंत कुठं कुठं किती किलोमीटरचे रस्ते तयार केले, त्यासाठी किती निधी मंजूर झाला, किती दिवसात रस्ता तयार झाला, याची सगळी माहिती देण्यात आली आहे.

गडकरींच्या रस्ते विकास कामांच्या घोषणांची ‘साबणाचे बुडबुडे’ म्हणत राज ठाकरे यांनी खिल्ली उडवली होती. रविवारी झालेल्या या भाषणानंतर लगेच दुसऱ्या दिवशी सोमवारी गडकरी यांनी कृष्णकुंजवर ही यादी पाठवली .महाराष्ट्रात रस्त्याच्या कामांसाठी 2 लाख 82 हजार कोटी, बंदरविकासासाठी 70 हजार कोटी तसंच सिंचन प्रकल्पांसाठी 75 हजार कोटी रुपये मंजूर झाल्याचं, गडकरींनी राज ठाकरेंना पाठवलेल्या अहवालात म्हटलं आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!