Share

‘कंगनासारखे उपरे आणि डिनो, गोमेझ, जॅकलिन आणि पटानी अस्सल मराठी! हो ना’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : अभिनेत्री कंगना रणौत आणि शिवसेनेमधील सुरु असलेल्या संघर्षावर नितेश राणे यांनी शिवसेनेवर टीकेची झोड उठवली आहे. कंगनासारखे उपरे आणि डिनो, गोमेझ, जॅकलिन आणि पटानी अस्सल मराठी! हो ना?? असा चिमटा नितेश राणेंनी काढला आहे.

शिवसेने कंगना रणौत विरोधात एकत्र येण्याची मागणी केली आहे. तसेच सामानाच्या अग्रलेखातून कंगनानावर टीकाहो केली आहे. मुंबई म्हणजे पाकव्याप्त काश्मीर वगैरे विधान करून समस्त मराठी जनांचा, मुंबईसाठी बलिदान दिलेल्या १०६ हुतात्म्यांचा अवमान करणाऱ्या उपऱ्या व्यक्तिविरोधात सभागृहात पक्षभेद मोडून आवाज उठायलाच हवा. त्यात विरोधी पक्षनेत्यांनी पुढाकार घ्यायला हवा.असे या अग्रलेखात म्हंटले आहे. महाराष्ट्र जितका शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा आहे. तितकाच तो भाजपाचाही असायला हवा. महाराष्ट्राच्या हुतात्म्यांचा अवमान ही मंडळी कसा काय सहन करू शकतात. मुंबईत खाऊन पिऊन तरारलेली एक महिला फिल्मी कलावंत मराठी अस्मितेवर दारुच्या गुळण्या टाकते हे सहन करता येणार नाही. आणि राज्याच्या विधिमंडळात या प्रकाराची निंदा करायलाच हवी, असे सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे. यावरून नितेश राणेंनी शिवसेनेवर ट्विटरच्या माध्यमातून निशाणा साधला आहे.

शिवसेनेने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला ; काँग्रेसचा आरोप

कंगनासारखे उपरे आणि डिनो, गोमेझ, जॅकलिन आणि पटानी अस्सल मराठी! हो ना?? असा चिमटा नितेश राणेंनी काढला आहे. तसेच टेंडर देताना आणि पार्ट्या करताना मराठी अस्मिता कुठे जाते? असा सवाल नितेश राणेंनी विचारला आहे.

‘मुंबईसाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांचे अवमान करण्याऱ्या कंगना विरोधात पक्षभेद विसरून आवाज उठवा’

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!