Share

शिवसेनेने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला ; काँग्रेसचा आरोप

Published On: 

 

मुंबई : कंगनाचे मुंबईबद्दल विधान चुकीचे आहे, त्याचा आम्ही विरोध करतो पण शिवसेनेने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला आहे. असा आरोप काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी केला आहे.

संजय निरुपम यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, कंगना राणौतनं मुंबईबद्दल जे विधान केले आहे ते आम्हा कोणालाच मान्य नाही. तिच्या वक्तव्याचा आम्ही निषेध केला. पण शिवसेनेने छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन कंगनावर अर्वाच्च भाषेचा वापर केला. ही शिवसेनेची निराशा आहे. छत्रपतींच्या नावावर उघडपणे शिविगाळ करणे हा महाराजांचा अपमान आहे. सरकारमध्ये बसलेल्या लोकांनी या गोष्टीचा निषेध केला पाहिजे अशी मागणी त्यांनी केली.

‘मुंबईसाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांचे अवमान करण्याऱ्या कंगना विरोधात पक्षभेद विसरून आवाज उठवा’

अभिनेत्री कंगना रणौत आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यातील वादाची ठिणगी कंगनाने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्याने पडली. यानंतर कंगना विरोधात शिवसेनेने आवाज उठवत तिला खडेबोल सुनावले होते.

‘दाऊदला दम देण्याच्या बाता मारणारे आपले शौर्य एका बाईला दाखवतात

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!