Share

नितेश राणे योग्यच ; मनसेनी केली सुटकेची मागणी

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : मुंबई-गोवा महामार्गावरीत खड्ड्यांमुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत होते. या विरोधात नितेश राणे यांनी उप-अभियंत्याला गडनदी पुलावर बांधून त्यांच्या डोक्यावर चिखलाचे पाणी टाकत आंदोलन केले होते. त्यानंतर त्यांना अटक झाली होती. अशातच नितेश राणे यांची सरकारने लवकरात लवकर सुटका करावी आणि कामचुकार इंजिनिअर्सवर कडक कारवाई करावी अशी मागणी मनसेतर्फे करण्यात आली आहे.

मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी राणे यांना पाठिंबा दिला आहे. “नितेश राणे यांनी केलं ते योग्यच केलं. रस्ते दुर्घटनेस कारणीभूत ठरून हजारो बळी घेणाऱ्या इंजिनिअर्सवर कारवाई कधी करणार?”, असा प्रशानंही त्यांनी सरकारला विचारला आहे. तसेच पुढे बोलताना त्यांनी ‘लाखो रुपये खाऊन इंजिनिअर्सना कळणार नसेल तर त्यांना ज्या भाषेत कळतं त्या भाषेतच समजवावे लागले असंही संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे.

दरम्यान, नितेश राणेंच्या या कृत्यावरून त्यांचे वडील नारायण यांनी ‘त्याने स्वत:साठी नाही लोकांसाठी आंदोलन केलं आहे. त्याची चूक ही आहे की त्याने आंदोलन सुरु केलं. अधिकाऱ्यावर चिखल फेकणे हे अयोग्य आहे. मी माफी मागतो”, असं म्हणत राणे यांनी माफी मागितली होती.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!