Share

आम्हाला वृत्त निवेदक नव्हे तर मुख्यमंत्र्यांची गरज आहे; नितेश राणेंची मुख्यमंत्र्यांवर टीका

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा – राज्यात कोरोनाचा फैलावावर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नांची पराकाष्टा करत आहे. सरकारकडून रोज घेण्यात येणाऱ्या निर्णयांची माहिती रोज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे , उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे पत्रकार परिषदेतून देत असतात.

आता भाजपचे आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांनी आपल्या पुढील पत्रकार परिषदेत काही गोष्टींची घोषणा करावी अशी मागणी केली आहे. ते म्हणतात

‘आम्ही आमच्या मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत काय अपेक्षा करतोः

–  महाराष्ट्रातील सर्व डिस्टिलरीजना अल्कोहोल आधारित सॅन्टायटीस बनविण्यासाठी सांगावे.

– वीज, मालमत्ता, मोबाइल इ. देय बिले यांना दंड न लावता एका महिन्याची मुदतवाढ द्यावी

– वृद्धांसाठीचे निवृत्तीवेतन दोन महिने आगाऊ द्यावे.

– या काळात सर्वकाही गमावलेल्या बीपीएल कुटुंबांना मूलभूत रेशन द्यावे

-या काळात व्यवसायात गमावलेल्या आमच्या व्यापारी वर्गासाठी आर्थिक मदत.

– जिल्हा बँकांना ३१ मार्च अखेरच्या वसुलीबाबत मुदतवाढ द्यावी .

आम्हाला वृत्त निवेदक नव्हे तर मुख्यमंत्र्यांची गरज आहे! अशी टीकाही त्यांनी ठाकरेंवर केली आहे.

हेही पहा –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!