Share

‘आता सत्तेच्या लाचारीसाठी बाळासाहेबांच्या शिवसेनेचं नाव बदलणार का?’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान अर्थातच राणी बाग म्हणून ओळखल्या जाणार्‍या उद्यानातील नव्या फलकावरून गैरसमज पसरवले जात असतानाच आता भाजप नेते नितेश राणे यांनीही यावर ट्वीट करत ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.गेल्या अनेक वर्षांपासून राणीबागेत हजरत हाजी पीर बाबा यांचा दर्गा आहे. या दर्ग्याची माहिती देणार्‍या  सूचना फलकावर प्रशासनाने ‘हजरत हाजी पीर बाबा राणी बाग’ असा उल्लेख केल्याने यावर आक्षेप घेतला जात आहे. यावरच नितेश राणे (Nitesh Rane) यांनीही टीका केली आहे.

तमाम हिंदूच्या मॅांसाहेब जिजामाता भोसले यांच्या नावाने असलेले वीर जिजामाता उद्यानाचे नाव रातोरात बदलून हजरत पीर बाबा अशी कोनशीला लावून बदलले आहे. आता सत्तेच्या लाचारीसाठी बाळासाहेबांच्या शिवसेनाचं नाव बदलणार का? असा सवाल नितेश राणे यांनी ट्वीट करत केला आहे.

खरंच राणीच्या बागेचे नाव बदलले का?

दरम्यान प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी दिलेल्या माहितीनुसार मुळात उद्यानाचे नाव राणी बाग नसून वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालय असे आहे. पूर्वीच्या काळापासून लोक उद्यानास राणीबाग म्हणून संबोधत आले आहेत. त्यामुळे जिजामाता उद्यानातील या जुन्या दर्ग्याचे नाव ‘हजरत हाजी पीर बाबा राणीबाग’ असे पडले आहे. या दर्ग्याची माहिती देणारा सूचना फलक उद्यानात लावण्यात आला आहे. उद्यानात प्रवेश करताना मुख्य प्रवेशद्वारावर आजही ‘वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय’ असे नाव आहे. त्यात कोणताही बदल केलेला नाही. त्यामुळे कुणीही यावर आक्षेप घेण्याचे कारण उरत नाही. असे म्हटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!