Share

Nitesh Rane । “हिंदूंकडे वाकड्या नजरेने पाहिल्यावर सत्कार व्हायला हे मविआ सरकार नाही”; नितेश राणेंचा हल्लाबोल

Published On: 

🕒 1 min read

Nitesh Rane ।  मुंबई : बुधवारी कोल्हापुरात लव्ह जिहादविरोधात हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी उपस्थित आंदोलकांना संबोधित करताना महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली आहे. भाजपा आमदार नितेश राणे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रुपाने एक कडवट हिंदुत्ववादी माणूस गृहमंत्री म्हणून बसले आहेत, असं वक्तव्य केलं आहे.

तसेच हिंदू म्हणून आवाज उठवणाऱ्यांना सुखरुप घरी पाठवेन असा शब्दही नितेश राणे (Nitesh Rane) यांनी आंदोलकांना दिला. नितेश राणे म्हणाले, तुम्ही हिंदू म्हणून आवाज उठवा, एकत्र या. तुम्हाला पुढे कसं सुखरुप घरी पाठवायचं हे नितेश राणे पाहून घेईल. मी तुम्हाला शब्द देतो. कारण तिथं देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) गृहमंत्री म्हणून बसले आहेत हे लक्षात ठेवा.

एक कडवट हिंदुत्ववादी माणूस गृहमंत्री म्हणून बसले आहेत. त्यामुळे तुम्ही काहीच चिंता करू नका. फक्त हिंदू समाज म्हणून भीती निर्माण करणं गरजेचं आहे, असंही नितेश राणेंनी म्हटलं. आज राज्यात हिंदुत्वाच्या विचाराचं सरकार असल्याचं सांगत राणेंनी महाविकास आघाडीला टोला लगावला आहे.

आज राज्याचा अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक नाही, हसन मुश्रीफ मंत्री नाही, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नाही. हिंदू म्हणून वाकड्या नजरेने पाहिलं तर त्याचा सत्कार व्हायला हे मविआ सरकार नाही, असं म्हणत त्यांनी महाविकास आघाडीला चिमटा काढला आहे. राणेंच्या या वक्तव्याला महाविकास आघाडीकडून काय उत्तर येणार हे पाहावं लागणार आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!