🕒 1 min read
मुंबई-काल शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यातून जनतेशी ऑनलाईन संवाद साधला. राज्यात सत्ता आल्यानंतरचा आणि उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपद स्वीकारल्यानंतर पहिल्याच दसरा मेळाव्यात जनतेशी संवाद साधला.
या मेळाव्यात ठाकरे यांनी राणे कुटुंबीयांवर देखील हल्लाबोल केला. शिवसेनाचा दसरा मेळावा कोणाला टार्गेट करण्यासाठी नाही. पण काही जणांना इंजेक्शन देणे गरजेचे असते ते आम्ही देतो. बेडके किती ही फुगले तरीही ते वाघ होत नाहीत, तुम्हाला माहिती आहे, एक बेडूक आणि त्याची दोन पोरं या पक्षातून त्या पक्षात उड्या मारतात. या बेडकाच्या पिल्लांनी वाघ पाहिला, त्यांनी बाबांना सांगितलं, असा टोला उद्धव ठाकरेंनी राणे पिता-पुत्रांना लगावला.
दरम्यान, आज मी मुख्यमंत्रीपदाचा मास्क बाजूला ठेवलाय. ज्याला कुणाला खुमखुमी आली असेल तर त्यांनी आजमावून पाहा. तुम्ही जर आमच्या वाटेला आलात तर तुम्हाला धडा शिकवला जाईल असा इशार देखील विरोधकांना काल ठाकरे यांनी दिला.
राज्यातली महाविकास आघाडीचं सरकार पाडण्याच्या गोष्टी काहीजण करत आहेत. त्यासाठी तारीख पे तारीख देत आहेत. हिंमत असेल तर त्यांनी सरकार पाडून दाखवा, असं आव्हान उद्धव ठाकरेंनी दिलं.
महत्वाच्या बातम्या
- प्रकाश आंबेडकरही घेणार ऊसतोड कामगार आणि मुकादम यांचा मेळावा
- मिर्झापूर वेब सिरीज मुळे जिल्ह्याची बदनामी- अनुप्रिया पटेल
- ‘बहिर्जी’ स्वराज्याचा तिसरा डोळा’ चित्रपटातून ‘बहिर्जी नाईकांच्या चरित्राला उजाळा
- डॉक्टरांची मेहनत फळाला आली; कपिल देव यांना मिळाला डिस्चार्ज
- ‘लालूंनी जादूटोण्याच्या सहाय्याने मला मारण्याचा प्रयत्न केला’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
