Share

हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा, ठाकरेंनी विरोधकांना दिले पुन्हा एकदा आव्हान

Published On: 

🕒 1 min read

मुंबई-काल शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यातून जनतेशी ऑनलाईन संवाद साधला. राज्यात सत्ता आल्यानंतरचा आणि उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपद स्वीकारल्यानंतर पहिल्याच दसरा मेळाव्यात जनतेशी संवाद साधला. राज्यातली महाविकास आघाडीचं सरकार पाडण्याच्या गोष्टी काहीजण करत आहेत. त्यासाठी तारीख पे तारीख देत आहेत. हिंमत असेल तर त्यांनी सरकार पाडून दाखवा, असं आव्हान उद्धव ठाकरेंनी दिलं.

शिवसेनेचा दसरा मेळावा म्हणजे महाराष्ट्राची सांस्पृतिक परंपराच जणू. दरवर्षी शिवतीर्थावर या मेळाव्यासाठी लाखोंचा जनसागर उसळतो. विचारांचे सोने लुटले जाते. यंदा मात्र कोविड संकटामुळे हा मेळावा शिवतीर्थावर न होता नजीकच्याच स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात संपन्न झाला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा स्वीकारल्यानंतर हा पहिलाच दसरा मेळावा. त्यामुळे हा ‘महाविजयादशमी’ मेळावा होता.

दरम्यान, आज मी मुख्यमंत्रीपदाचा मास्क बाजूला ठेवलाय. ज्याला कुणाला खुमखुमी आली असेल तर त्यांनी आजमावून पाहा. तुम्ही जर आमच्या वाटेला आलात तर तुम्हाला धडा शिकवला जाईल असा इशारा देखील विरोधकांना काल ठाकरे यांनी दिला.मुंबई, बिहार ते दिल्ली अशा सर्वच ठिकाणी उभ्या राहिलेल्या बाहुल्या, रावणी, काळी टोपी आणि बेडकी अशा उपमा देत विरोधकांना त्यांनी अक्षरशः सोलून काढले.

दरम्यान, भाजपने बिहारमध्ये नितीश कुमार यांना मुख्यमंत्री पदासाठी पाठिंबा दर्शवला आहे. हीच खेळी त्यांनी महाराष्ट्रात केली होती. एकीकडे पाठिंबा दाखवायचा आणि छुप्या मार्गाने दगा करायचा. मात्र आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकलोय. महाराष्ट्रातही हाच डाव होता, मात्र शिवसेनेनं हा डाव हाणून पाडला, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!