Share

कोरोनाच्या संकटातून गरिबांना सावरण्यासाठी केंद्र सरकारची मोठी घोषणा

Published On: 

नवी दिल्ली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनमुळे देशातील गरिबांवर उदरनिर्वाहाचे मोठे संकट आले आहे. याबाबत विचार करून केंद्र सरकारने गरिबांसाठी तसेच वृद्ध, विधवा, महिलांसाठी विशेष योजनांची घोषणा केली आहे. भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी याबाबत पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.

त्या म्हणाल्या की, गरीब जनतेवर कोरोनामुळे आपत्ती आली आहे. यासाठी केंद्र सरकार गरिबांच्या कल्याणासाठी काही विशेष योजना देत आहे. गरीब जनते साठी १ लाख ७० हजार कोटींचे पॅॅकेज केंद्र सरकारकडून देण्यात  येत आहे. तसेच आरोग्य कर्मचार्यांसाठी विशेष तरतूद  म्हणून केंद्राकडून ३० लाख  कर्मचार्यांसाठी ५० लाखाचा विमा देण्यात येणार आहे.

या आपत्तीच्या काळात गरिबांनी उपाशी झोपू नये यासाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेच्या मार्फत ८० करोड लोकांना मोफत ५ किलो गहू – तांदूळ आणि एक किलो डाळ  देण्यात  येणार आहे. तसेच शेतकऱ्यांच्या खात्यात किसान योजने अंतर्गत एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात २००० रुपये जमा होणार आहेत. या योजनेचा फायदा देशातील ८ कोटी ७० लाख शेतकऱ्यांना होणार आहे.

मनरेगा योजने मार्फत  मजदूरांसाठीही उपाययोजना करण्यात आली आहे. मजदुरांच्या खात्यात २००० रुपये जमा करण्याचा निर्णय केंद्र सरकारकडून करण्यात आला आहे. तसेच उज्वला योजने अंतर्गत दारिद्र्य रेषे खाली असणाऱ्या ८० करोड महिलांना पुढील ३ महिने मोफत  घरगुती गॅॅस  मिळणार आहे, असेही निर्मला सीतारामन यांनी  सांगितले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!