Share

‘केंद्र सरकार शक्य ते करून दाखवत आहेतच, आता तुम्ही काहीतरी करून दाखवा’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : ‘मुंबईला कोरोना मुक्त कधी करणार ?, मुंबईला पूर्वपदावर कधी आणणार?, मुंबईकरांना मृत्यूच्या दाढेतून कधी वाचवणार? ,’ असे सवाल भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी शिवसेनेला विचारले आहे. तसेच ‘केंद्र सरकार शक्य ते करून दाखवत आहेतच. आता तुम्ही काहीतरी करून दाखवा ना!,’ असा इशारा शेलार यांनी दिला आहे.

तसेच पुढे शेलार यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. याबाबत बोलताना शेलार म्हणतात, ‘देशासाठी पॅकेज जाहीर झाल्यावर त्यातून मुंबईला कसे वेगळे काढणार? सर्वाधिक उद्योग आणि करदाते मुंबईत असल्याने पॅकेजचा सर्वाधिक फायदा मुंबईलाच होईल!’.

मात्र तरीसुद्धा पत्रपंडित म्हणतात की, मुंबईसाठी वेगळे पॅकेज द्या?, हे म्हणजे रोज सकाळी उचलली जीभ लावली टाळ्याला, असं म्हणत शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं आहे.
दरम्यान, 4 चे सूतोवाच करताना पंतप्रधानांनी 20 लाख कोटींचे पॅकेज जाहीर करूनही शेअर बाजाराच्या बैलाने साधे शेपूटही का हलवले नाही?, असं म्हणत सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेनं मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं होतं.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!