टीम महाराष्ट्र देशा : ‘मी जास्त कांदा, लसूण खात नाही त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही. मी अशा कुटुंबातून आली आहे, ज्या ठिकाणी कांदा जास्त प्रमाणात खाल्ला जात नाही,’ निर्मला सीतारामन यांच्या या वक्तव्यावर सोशल मीडियामधून मोठ्या प्रमाणात टीका होत आहे.
बुधवारी ससंदेच्या सुरू असलेल्या सत्रात कांद्याच्या दरवाढीवर चर्चा करण्यात आली. सतत वाढत जाणारे कांद्याचे दर हे सरकारसाठीही चिंतेचा विषय ठरत आहेत. याचबाबत कांद्याच्या वाढत्या दराबाबत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना सवाल करण्यात आला.
यावेळी सीतारमन यांनी अजब गजब व्यक्तव्य केले. तसेच यावेळी सीतारामन यांनी ‘आपले कुटुंबीय कांदा, लसूणसारखे पदार्थ जास्त खात नसल्याचं,’ अजब स्पष्टीकरण दिले.
दरम्यान, तुर्कीकडून ११ हजार टन तर इजिप्तकडून ६ हजार ९० टन कांदा आयात करण्यात येणार आहे. तसेच सीताराम यांच्या या विधानामुळे त्यांच्यावर सर्व क्षेत्रातून टीका होत आहे.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1202424937325068289?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1202426309709717504?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

