Share

ईम्तीयाज जलीलांनी धार्मिक स्थळं उघडण्यासाठीचे आंदोलन मागे घ्यावे-मुस्लिम धर्मगुरूंचं आवाहन

Published On: 

औरंगाबाद : राज्यात सध्या धर्मस्थळ उघडण्यासाठीची आंदोलने प्रचंड गाजत आहेत.आणि दररोज यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने नवीन गोष्टी समोर येत आहेत. काल औरंगाबादमध्ये खासदार ईम्तीयाज जलीलांनी मंदिर उघडण्यासाठी आंदोलन केले म्हणून आता त्यांच्यावर काही मुस्लिम धर्मगुरू नाराज झाले आहेत.धार्मिक स्थळांबाबतचे आंदोलन मागे घ्यावं आणि सरकारच्या पुढील आदेशाची वाट बघावी असं औरंगाबादचे मुस्लिम धर्मगुरू मोहम्मद नसिमुद्दीन यांनी म्हटलंय.

सुरुवातीला भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागात आपल्या शिर्ष नेत्यांना उतरवून या संबंधित आंदोलन केले होते. त्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे मुख्य नेते प्रकाश आंबेडकर यांनी थेट पंढरपूरमध्ये आंदोलन केले.त्या आंदोलनात सोशल डिस्टनसिंगचा पुरता फज्जा झाल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळालं होतं. आंदोलनानंतर त्यांनी त्याठिकाणी विठ्ठलाचं दर्शनही घेतलं.

पत्रकार पांडुरंग रायकर यांच निधन हलगर्जीपणामुळे; पालकमंत्री अजित पवार यांचे चौकशीचे आदेश

काल या प्रकरणावरुन औरंगाबादचे राजकारण प्रचंड तापले होते. औरंगाबाद मध्ये एमआयएम खासदार ईम्तीयाज जलील यांनी शहरातील मंदीरं उघडण्याची मागणी करत आंदोलन करण्याचं ठरवलं होतं. त्यांनी औरंगाबादमधील खडकेश्वर परिसरातील महादेव मंदीरात मंदिर उघडण्यासाठी पुजाऱ्यांना निवेदन देण्यासाठी आपल्या समर्थकांसह गर्दी केली असता तेव्हा शिवसेचे आमदार अंबादास दानवे व माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनीही या आंदोलनात उडी घेत जलीलांचा विरोध केला.

व्हिडिओद्वारे अण्णा हजारेंनी भाजपला सुनावले

शिवसेनेचे नेते कार्यकर्त्यांसह या मंदिराबाहेर जमल्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी, मंदिर-मशीदी जलीलांची खासगी मालमत्ता नाही असा टोला शिवसेनेचे विधानपरिषदेचे आमदार डॉ. अंबादास दानवे यांनी लगावला. तर, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी हिंदूंची मंदिरं खुली करण्याशी एमआयएमचा संबंध नसून हिंदू मंदिरं खुली करण्यास आम्ही समर्थ असल्याचा इशारा देखील त्यांनी काल दिला होता.

अहमदनगर जिल्ह्यातील दुकानदारांसाठी खुशखबर… दुकाने खुली ठेवण्याबाबत नवी नियमावली

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!