Share

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना कोरोनाची लागण

Published On: 

गोवा : दिवसेंदिवस कोरोना रुग्णांचा वाढत आकडा हा नवनवीन उच्चांक गाठत असतानाच सामान्य व्यक्तीपासून ते राजकीय नेते, मंत्री, लोकप्राधिनिधी व बॉलिवूड स्टार्सना देखील कोरोनाचा विळखा पडत असल्याचे दिसून येत आहे. आता, राज्याला लागून असलेल्या गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर येत आहे.

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी स्वतः ट्विट करत कोरोनाची लागण झाल्याचे सांगितले. सद्या, त्यांना कोणतेही लक्षणे नसून घरीच विलगीकरणात राहण्याचा प्रकार त्यांनी निवडला आहे. त्यांनी घरूनच कारभार चालू केला आहे. त्यांनी संपर्कात आलेल्या व्यक्तींना आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

ईम्तीयाज जलीलांनी धार्मिक स्थळं उघडण्यासाठीचे आंदोलन मागे घ्यावे-मुस्लिम धर्मगुरूंचं आवाहन

विशेष म्हणजे आजपासून गोव्याच्या सर्व सीमा खुल्या करण्यात आल्या आहेत. सोबतच राज्यातील आणि बार, रेस्टॉरंटदेखील खुली करण्यात आली आहेत. प्रमोद सावंत यांनीच सोमवारी ही घोषणा केली आहे. केंद्र सरकारच्या नव्या गाईडलाईन्सनुसार कालपासून राज्याच्या नव्या सीमा खुल्या झाल्या आहेत. सर्व वाहनांना गोव्यामध्ये प्रवेश दिला जाणार असून त्यांची कोरोना चाचणी केली जाणार नाही, असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.

पत्रकार पांडुरंग रायकर यांच निधन हलगर्जीपणामुळे; पालकमंत्री अजित पवार यांचे चौकशीचे आदेश

दरम्यान, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे पुत्र आणि भाजप आमदार पंकज सिंह यांच्यामध्ये काही लक्षणे आढळून आल्याने कोरोना चाचणी करण्यात आली होती. यानंतर, त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. पंकज सिंह यांनी स्वतः ट्विट करून याबाबत माहिती दिली असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

व्हिडिओद्वारे अण्णा हजारेंनी भाजपला सुनावले

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!