मुंबई : नो पार्किंगमध्ये गाडी उभी करण्यावरुन झालेल्या वादातून पोलिसांना अर्वाच्च शिवीगाळ करणाऱ्या तरुणाने अखेर जाहीर माफी मागितली. घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर अवघ्या 24 तासात तरुणाने पोलिसांची दिलगिरी व्यक्त केली “मुंबई पोलिसांना सलाम करतो, ज्यांना वाईट वाटलं, त्यांची मनापासून माफी मागतो” असा व्हिडीओ जतीन सतरा या तरुणाने सोशल मिडीयावर शेअर केला आहे.
दरम्यान, तत्पूर्वी मुलुंडच्या बाजार या याठिकाणी जतीन नावाच्या या व्यक्तीनं नो पार्किंगमध्ये गाडी उभी केली होती. यावरून वाहतूक पोलीस आणि त्या व्यक्तींमध्ये कारवाईवरून वाद झाला. तेव्हा संतापलेल्या व्यक्तीनं पोलिसांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली.
दरम्यान, हा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी या व्यक्तीविरोधात संताप व्यक्त केला होता आणि कारवाईची मागणी देखील केली होती.पोलिसांना शिवीगाळ करताना त्याने एका जातीचा उल्लेख केला होता. यानंतर रात्री विविध पक्ष, संघटनांचे कार्यकर्ते मुलुंड पोलीस ठाण्यात आले आणि त्यांनी जातीयवाचक शब्द वापरल्याने जतीनवर अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यानंतर मुलुंड पोलिसांनी तसा गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान आज जतीनला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. पोलिसांना शिवीगाळ प्रकरणात त्याला जामीन मंजूर झाला असला तरी मुलुंड पोलीस त्याला पुन्हा अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्याअंतर्गत अटक करतील अशी शक्यता निर्माण झाली आहे.
माफी मागताना जतीन काय म्हणाला ?
“मी जतीन प्रेमजी सतरा, मुलुंडचा रहिवासी, आरआरटी रोडवर वाहतूक पोलिसांसोबत मी जे गैरवर्तन केलं, त्यासाठी मी माफी मागतो. फ्रंटलाईनवर काम करणाऱ्या मुंबई पोलिसांना मी सलाम करतो. ज्या-ज्या पोलिसांना वाईट वाटलं, त्यांची मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो” असं जतीन व्हिडीओमध्ये बोलताना दिसतं.
- पंढरपूर – मंगळवेढ्याला पाण्यापासून वंचित ठेवण्याचे पाप भाजपनेच केले – राष्ट्रवादी
- पत्नी सोबत वेळ घालवता यावा म्हणून अनुपम खेर यांनी अमेरिकन सीरिजला ठोकला रामराम
- मुख्यमंत्री फार सौम्य आहेत, त्यांनी कठोर पावलं उचलली पाहिजे – संजय राऊत
- ‘घराघरात भांडणं लावून घरं फोडली त्या शरद पवारांच्या घरातच आता टोकाची भांडणं सुरू आहेत’
- ‘भाजपकडे 105 तर महाविकास आघाडीकडे 170 आमदार आहेत; मग सत्तापरिवर्तन कसे होणार?’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

