टीम महाराष्ट्र देशा : राज्यात आणि विशेषकरून देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये कोरोनाची स्थिती चिंताजनक आहे. रोजच्या रोज मुंबईमध्ये कोरोना बाधित रुग्णांचा आकडा वेगाने वाढतो आहे. यावरून राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर विरोधीपक्ष भाजप जोरदार टीका करत आहे तसेच सरकारमध्ये समन्वयाचा अभाव आहे असेही ते म्हणत आहे.
देशभरात कोरोनाशी झुंज देणाऱ्या डॉक्टर्स आणि आरोग्य योद्ध्यांना सुरक्षिततेसाठी आवश्यक असलेल्या PPE किट्स अजूनही उपलब्ध होत नाही. या संबंधीचे वृत्त माध्यमांमध्ये येतच असते. आता अश्याच एका वृत्ताचा दाखला देत भाजपचे नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी सरकारवर आणि वैयक्तिकरित्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
निलेश राणे यांनी सरकारच्या सर्व विभागांमध्ये अनागोंदी असून राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून आरोग्य विभागात मुलभूत सुविधाही मिळत नसल्याच म्हटलं आहे. ते ट्वीटरवर म्हणाले,
‘कोरोना केसेस वाढतायत, ppe किट्स व isolation beds कमी, यंत्रणेवर सरकारचा अंकुश नाही, कायदा मोडणाऱ्यांची संख्या मोठी आहे, रुग्णांची गैरसोय होत आहे, मुख्यमंत्री फक्त फेसबुक वर दिसतो. असा घरात बसून गोट्या खेळणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राची वाट लावतोय.’
कोरोना केसेस वाढतायत, ppe किट्स व isolation beds कमी, यंत्रणेवर सरकारचा अंकुश नाही, कायदा मोडणाऱ्यांची संख्या मोठी आहे, रुग्णांची गैरसोय होत आहे, मुख्यमंत्री फक्त फेसबुक वर दिसतो. असा घरात बसून गोट्या खेळणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राची वाट लावतोय. https://t.co/K3m488cZXF
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) April 21, 2020
हेही पहा –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

