Share

“…जाहीर करून फडणवीसांनी विरोधकांची झोप उडवलेली आहे”, अतुल भातखळकरांचा टोला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: मुख्यमंंत्री उद्धव ठाकरे १४ तारखेला जाहीर सभा घेणार आहेत. यावरच १४ तारखेनंतरच खरी पोलखोल सभा घेणार असल्याचा इशारा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल (१ मे ) सभेत दिला. भ्रष्टाचार तसेच बाबरी पाडल्याच्या  मुद्द्यावरून त्यांनी शिवसेनेला चांगलेच घेरले. यावरच भाजप नेते अतुल भातखळकर (atul bhatkhalkar) यांनीही ठाकरे सरकारवर निशाणा साधला.

बाबरी ढाचा पाडताना शिवसेनेचा एकही नेता हजर नव्हता या शब्दात त्यावेळी अयोध्येत हजर असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेच्या ‘बाबरी’ दाव्याचे पितळ उघडे पाडले. १४ मे नंतर आपण खरी पोलखोल सभा घेणार आहोत असे जाहीर करून त्यांनी विरोधकांची झोप उडवलेली आहे.”, असे ट्वीट अतुल भातखळकर यांनी केले आहे.

दरम्यान बाबरी ढाचा पाडला, तेव्हा मी तेथे होतो. भाजपचे नेते अयोध्येत होते. मी स्वत: त्या आधीची कारसेवाही केली. त्यामुळे बदायूच्या तुरुंगात १८ दिवसांचा तुरुंगवासही भोगला होता. ढाचा पाडल्यानंतर ज्या ३२ जणांवर खटले चालले, त्यात शिवसेनेचा महाराष्ट्रातील एकही नेता नव्हता, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. तसेच तुम्ही रामाच्या बाजूचे की रावणाच्या बाजूचे, याचा एकदा निकाल लावा, असा टोलाही फडणवीस यांनी लगावला.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!