Share

खाज आल्यावर कुत्रा पिसाळतो तसा ‘राऊत’ पिसाळलाय – निलेश राणे

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा – रत्नागिरीतील जो शिवसैनिक नाणार रिफायनरीला समर्थन करेल त्याचं थोबाड फोडा, अशी ताकीद शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी दिली आहे. आज  नाणार प्रकल्पा विरोधातील जाहीर सभेत राऊत यांनी ही भूमिका मांडली आहे.

मागील काही दिवसांपासून अनेक शिवसेना पदाधिकारी नाणार रिफायनरीच्या समर्थनार्थ उघडउघड भूमिका घेताना दिसत आहेत. त्यामुळे विनायक राऊत चांगलेच आक्रमक झाले आहेत. जो कोणी प्रकल्पाला समर्थन करेल त्याला सक्त ताकीद दिली आहे.

खासदार विनायक राऊत यांच्यासोबत सभेला शिवसेना उपनेते तथा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत हेही उपस्थित होते. त्यांनीही यावर भाष्य करत नाणार रिफायरीबाबत शिवसैनिकांनी सावध रहावं. कोणत्याही परिस्थितीत रिफायनरी होऊ देणार नाही, असं ते म्हणाले आहेत. यावेळी स्थानिक शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दाखवली.

दरम्यान, नाणार प्रकरण चांगलंच पेटण्याची शक्यता आहे. कारण आज नाणार विरोधकांची सभा झाल्यानंतर सोमवारी नाणार समर्थकांची सभा होणार आहे. त्यामुळे हा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे. तसेच काही दिवसापूर्वी राष्ट्रवादीच्या रत्नागिरीतील पदाधीकार्यानीही नाणार प्रकल्पाला पाठींबा दिला होता.

निलेश राणेंची टाका –

आता कोकणातील भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी विनायक राउतांवर टीका केली आहे. ते आपल्या ट्विटमध्ये  म्हणताय, ‘मीटर चोर राऊत सारखा हलकट नसेल. ज्या शिवसैनिकांनी जिवाचं रान करून मोदी लाटेत ह्याला निवडून आणला त्याच शिवसैनिकांना चपलेने मारायची वार्ता करतो. खाज आल्यावर कुत्रा पिसळतो तसा हा पिसळलाय.’

हेही पहा –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!