Share

विनायक राऊत मातोश्रींवरचा टॉमी,त्याला कोकणात राणेंवर भुंकायला पाठवलाय – निलेश राणे

Published On: 

 रत्नागिरी : खासदार विनायक राऊतांच्या आरोपाला माजी खासदार निलेश राणेंनी सडेतोड उत्तर दिलं आहे. “नारायण राणे मंत्री असताना शिवसेनेचे अनेक नेते उद्धव ठाकरे यांची कामं घेवून भेटायला यायचे. बाळासाहेबांच्या शेवटच्या काळात सुद्धा नारायण राणेंना फोन केला होता”, असा गौप्य स्फोट माजी खासदार निलेश राणेंनी केला आहे.

“मिलिंद नार्वेकरांपासून ते एकनाथ शिंदेपर्यंत सर्व शिवसेनेचे नते भेटायला यायचे, याचे सीसीटीव्ही फुटेज आहेत. आता जे मंत्री आहेत, ते राणे साहेबांकडे उद्धव ठाकरेंची किती कामे घेवून यायचे त्याची माहिती आमच्याकडे सुद्धा आहेत. बंद खोलीत कुणाला फोन करायची गरज नाही. त्यामुळे विनायक राऊतांनी उड्या मारु नयेत. आम्ही स्वयंभू आहोत, त्यामुळे आम्हाला ठाकरे सरकारची गरज नाही”, असा घणाघात निलेश राणेंनी केला.

“विनायक राऊत यांना चागले ते दिसत नाही. मेडिकल कॉलेजची परवानगी मिळते. मेडिकल काऊंसील ऑफ इंडियाकडून परवानगी येते. मेडिकल कॉलेलच्या जमीनसाठी आम्ही प्रायव्हेट कर्ज घेतलंय. त्यावर हॉस्पीटल आणि मेडिकल कॉलेज इथल्या परवानगीसाठी राज्य सरकारची गरज नाही. त्यामुळे शिवसेनेचा पोटात का दुखतंय?”, अशी बोचरी टीका निलेश राणेंनी केली.

विनायक राऊतांना कोकणात राणेंवर भुंकायला पाठवलाय – निलेश राणे

“ही जमीन सरकारची प्रायव्हेट आहे. त्यामुळे विनायक राऊतांना कोकणात राणेंवर भुंकायला पाठवलाय. विनायक राऊत मातोश्रींवरचा टॉमी लोकांची सेवा करणे ही त्यांची ड्युटी आणि त्या बक्षिसासाठी विनायक राऊत बोलतात. ग्रामपंचायतीची निवडणूक आणि आरोप राणेंवर त्यामुळे तुम्ही ग्रामपंचायत पातळीवर काही बोलले नाहीत”, असंही ते म्हणाले.

“2014 ते 2019 या कालावधीत गृहराज्यमंत्री पद दिपक केसरकर यांच्याकडे होते. त्यावेळी का नाही केल्या केसेस ओपन. त्यामुळे राणेंच्या बदनामीचा अजेंडा आहे. विनायक राऊत यांचा मुलगा वाया गेलाय त्यामुळे दुसऱ्यांची वाईट आपला चांगला होत नाही ना. मग, दुसऱ्यांवर टीका करा, हेच विनायक राऊतांचे ध्येय आहे”, असं म्हणत त्यांनी विनायक राऊतांवर टीका केली.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!