Share

राज्य सेवा पूर्व परीक्षा-2020 परीक्षा केंद्राच्या  शंभर मिटरच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी

Published On: 

🕒 1 min read

लातूर – महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्य सेवा पूर्व परीक्षा-2020 ही लातूर जिल्हयातील विविध 19 उपकेंद्रावर आयोजित करण्यात आली आहे. दिनांक 11 ऑक्टोबर 2020 (रविवार) रोजी सकाळी 10.00 ते दुपारी 12.00 (सकाळ सत्र) व दुपारी 03.00 ते 05.00 (दुपार सत्र) वाजेपर्यंत राहील.

या अनुषंगाने राजर्षी शाहू वाणिज्य महाविद्यालय, बस स्टँन्ड जवळ लातूर, श्री.देशीकेंद्र विद्यालय, सिग्नल कँम्प लातूर, यशवंत विद्यालय, नांदेड रोड लातूर, संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालय (कॉकसीट) अंबाजागाई रोड लातूर ब्लॉक अ (पहिला व दुसरा मजला), संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालय (कॉकसीट),अंबाजोगाई रोड लातूर ब्लॉक ब (दुसरा व तिसरा मजला ), दयानंद वाणिज्य व बी.सी.ए. महाविद्यालय बार्शी रोड लातूर,परिमल विद्यालय, नारायणनगर लातूर, महात्मा बसवेश्वर विज्ञान महाविद्यालय खंडोबा गल्ली लातूर, गोदावरी लाहोटी कन्या विद्यालय दयाराम रोड, सरस्वती विद्यालय प्रकाशनगर लातूर, दयानंद कला महाविद्यालय लातूर, जिजामाता कन्या प्रशाला नांदेड रोड लातूर.

राजर्षि शाहू विज्ञान महाविद्यालय बस स्टँड,लातूर, श्रीमती सुशिलादेवी देशमुख महाविद्यालय, खाडगांव रोड लातूर, ज्ञानेश्वर विद्यालय, शाहू चौक लातूर, श्री.मारवाडी राजस्थान विद्यालय लातूर, श्री. व्यंकटेश विद्यालय झिंगणअप्पा गल्ली लातूर, दयानंद विधी महाविद्यालय, बार्शी रोड लातूर व श्री.केशवराज विद्यालय शामनगर,लातूर येथील परीक्षा केंद्रावर मोठया प्रमाणावर परीक्षार्थी येणार आहे त्यामुळे परीक्षा कालावधीत परीक्षा केंद्रावर व परिसरात गर्दीमुळे कोणताही अनुचित प्रकार घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

अपर जिल्हादंडाधिकारी विजयकुमार ढगे यांनी फौजदारी प्रक्रियासंहिता 1973 चे कलम 144 अन्वये मिळालेल्या अधिकाराचा वापर करुन उक्त परीक्षा केंद्राच्या 100 मिटरच्या परिसरात पूढील प्रमाणे प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.

परीक्षा केंद्राचे परिसरात प्रवेश करतेवेळी पाच पेक्षा जास्त व्यक्ती एकत्रितरित्या प्रवेश करणार नाहीत. कोणत्याही प्रकारच्या घोषणा देण्यात येणार नाहीत, परीक्षा केंद्राचे परिसरात परिक्षार्थी अथवा अन्य व्यक्ती कडुन शांततेस बाधा निर्माण होईल असे कृत्य करण्यात येणार नाही. 100 मीटरच्या परिसरातील झेरॉक्स सेंटर्स, पानटपरी,टायपींग सेंटर,एस टी डी बुथ, ध्वनिक्षेपक इत्यादी माध्यमे आदेशाची मुदत संपेपर्यंत बंद होईल, परीक्षा केंद्राचे परिसरात मोबाईल फोन, सेल्युलर फोन, ई-मेल व इतर प्रसार माध्यमे घेऊन प्रवेश करण्यास मनाई असेल.कोणत्याही व्यक्तीकडुन परीक्षा सुरळीतपणे व शांततेच्या वातावरणामध्ये पार पाडण्यासाठी कोणतीही बाधा उत्पन्न करण्यात येणार नाही. परीक्षा केंद्रावर कोणत्याही अनाधिकृत व्यक्तीस/ वाहनास प्रवेश मनाई राहील.

हे आदेश परीक्षा केंद्रावर काम करणारे अधिकारी/कर्मचारी परीक्षार्थी केंद्रावर निगराणी करणारे अधिकारी व पोलीस अधिकारी, कर्मचारी यांचे बाबत त्यांचे परीक्षासंबंधी कर्तव्ये पार पाडण्याचे अनुषंगाने लागू राहणार नाही.सदर आदेश दिनांक 11 ऑक्टोबर 2020 (रविवार), रोजी सकाळी 09.00 ते सायंकाळी 06.00 वाजेपर्यंत लागु राहतील असे प्रशासनाने कळविले आहे.

महत्वाच्या बातम्या :-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!