Share

‘सामना’ पेपर नेहमीप्रमाणे झोपडपट्टीत लहान मुलं ‘पुसायला’ वापरतीलंच

Published On: 

मुंबई: राणे पिता- पुत्र आणि शिवसेनेमध्ये असणारा वाद नवीन नाही. माझी मुख्यमंत्री खा नारायण राणे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केल्यापासून ते शिवसेना नेत्यांच्या रडारवर असतात, आता दैनिक सामनामधून करण्यात आलेल्या टीकेवरून खा संजय राऊत हे राणे यांच्या रडारवर आले आहेत.

‘राज्याला किंवा देशाला संकटातून सावरण्यासाठी प्रति सरकारच्या विधायक भूमिकेत विरोधी पक्षाने वावरायचे असते, पण महाराष्ट्राच्या विरोधी पक्षात ‘बाटगे’ घुसले आहेत. त्यामुळे विरोधी पक्षाने स्वतःची प्रतिष्ठाच धुळीस मिळवली आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची तळमळ व तगमग आपण समजू शकतो. एकवेळ कोरोनावर लस सापडेल, पण विरोधकांच्या या तगमगीवर उपाय सापडणे कठीण असल्याचं अग्रलेखात म्हटलं आहे.

चहावाल्याच्या मुलीची गरुडझेप : एअरफोर्स अ‍ॅकेडमीत अव्वल, होणार ‘फ्लाईंग ऑफिसर’

निदान स्वतः फडणवीस हे भाजप-संघ परिवाराचे शंभर नंबरी कार्यकर्ते तरी आहेत, पण आम्हाला आश्चर्य वाटते ते भाजपच्या गोधडीत शिरून ठाकरे सरकारवर टीका करणार्या बाटग्यांचे. असे एक-दोन बाटगे नगर जिल्ह्यात आहेत आणि दोनेक पावटे तळकोकणात आहेत अशी बोचरी टीका सामनाच्या मुखपत्रातून नारायण राणे आणि राधाकृष्ण विखे पाटलांवर करण्यात आली आहे.

‘काँग्रेस पक्षाने 50 वर्षांच्या पप्पूला आता राजकीय अंगणवाडीत पाठविण्याचा निर्णय घ्यावा’

दरम्यान, नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर शेलक्या शब्दात टीका केली आहे. कोणतरी म्हणत होतं आज सामन्यातून आमच्यावर नाव न घेता टीका केली आहे. संज्या… ही भीती तुझ्या मनातली अशीच कायम राहिली पाहिजे. बाकी विषय ‘सामना’ पेपर चा तो तर नेहमीप्रमाणे झोपडपट्टीत लहान मुलं पुसायला वापरतीलंच, असा टोला निलेश यांनी लगावला आहे.

आमदार नितेश राणे यांनी देखील ट्वीट करून संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘सामनाचं आमच्यावर प्रेम आहे. असणारच..का नाही असणार शेवटी Old is gold! पण, काँग्रेसच्या थोरातांची इतकी चिंता पण ग्रामीण भागातल्या जुन्या कडवट शिवसेनेच्या नेत्यांना विचारायचं पण नाही. काही पत्र माझ्याकडे आहेत. तळकोकणच्या प्रहारमधून लवकरच छापतो. मग बघू कशी कुरकुर होते, असा थेट इशाराच नितेश राणे यांनी सेनेला दिला आहे.

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!