नवी दिल्ली- भारत- चीनमधील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या भूमिकेवरील टिकास्त्र सुरूच ठेवले असून आज त्यांनी ‘नरेंद्र मोदी हे प्रत्यक्षात सरेंडर मोदी आहेत,’ अशी खोचक टीका केली आहे.
Narendra Modi
Is actually
Surender Modihttps://t.co/PbQ44skm0Z
— Rahul Gandhi (@RahulGandhi) June 21, 2020
‘जपान टाईम्स’मधील एका लेखाची लिंक शेअर करत राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. नरेंद्र मोदी हे खरं तर सरेंडर मोदी आहेत, असं राहुल गांधी यांनी ट्विटरवर लिहिलं आहे.
राहुल गांधी यांनी शनिवारीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडलं होतं. चीनच्या आक्रमणापुढे पंतप्रधानांनी भारतीय भूमी सरेंडर केली, असं ट्विट करत मोदींवर हल्ला चढवला होता. शिवाय त्यांनी काही प्रश्नही उपस्थित केले होते. “जर ती जमीन चीनची होती तर, भारतीय जवान का शहीद झाले? आणि ते कोठे शहीद झाले?” असे सवाल देखील उपस्थित केले होते.
दरम्यान, आता भाजपने सुद्धा राहुल गांधी यांच्यावर तोफ डागली असून राहुल गांधींच्या टीकेला शेलक्या शब्दात उत्तर दिले आहे. काँग्रेस पक्षाने 50 वर्षांच्या पप्पूला आता राजकीय अंगणवाडीत पाठविण्याचा निर्णय घ्यावा, अशी टीका भाजप नेते मुख्तार अब्बास नक्वी यांनी केली आहे. देशाची संस्कृती, परंपरा शिकून त्यांनी राजकीय अज्ञानापासून मुक्तता मिळवावी, असा टोला देखील नक्वी यांनी लगावला आहे.
नेमकं काय म्हणाले मुख्तार अब्बास नक्वी
वायनाडचे खासदार असलेल्या 50 वर्षीय पप्पू यांना त्याच्या कुटुंबीयांनी राजकीय अंगणवाडीत पाठवायला हवे. त्यांना राजकीय अंगणवाडीत पाठवत नाही तोपर्यंत त्यांची घराणेशाही विचारधारा आणि तिरस्कार करणारी भाषा थांबणार नाही. त्यांना देशाची संस्कृती, परंपरा माहिती नाही. राजकीय वादासाठी निराधार अफवांवर ते विश्वास ठेवत आहे. असे असतानाही काही वेळा ते देशाची सुरक्षा, अर्थव्यवस्था आणि नेतृत्वाबाबत प्रश्न उपस्थित करतात. तुम्ही केवळ पंतप्रधानांचा अनादर करीत आहात. राहुल गांधींनी वापरलेले शब्द या देशाच्या इतिहासात कोणीही वापरलेले नाहीत. त्यामुळे त्यांच्यात आता सुधारणा होणे गरजेचे आहे. केवळ अज्ञानी व्यक्तीकडून अशा प्रकारच्या शब्दांचा वापर होऊ शकतो.
राहुल गांधी यांच्या ट्विटला भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शाहनवाज हुसैन यांनीही उत्तर दिले आहे. ते म्हणाले की, राहुल गांधी ज्या अपमानास्पद शब्दांचा वापर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी करत आहेत, तसा वापर शत्रू राष्ट्रातील नेतेही करत नाहीत. पंतप्रधान आणि देशाचा राहुल गांधी सातत्याने अपमान करत आहेत. त्याचबरोबर राहुल गांधी यांनी सरेंडरच्या स्पेलिंगमध्ये चूक केल्याचे काही नेटकऱ्यांनी म्हटले आहे. आता त्यांना त्यावरुन ट्रोल केले जात आहे.
कोरोनाचा उद्रेक : पंतप्रधान नरेंद्र मोदी साधणार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी संवाद
मोदीजी हीच वेळ आहे… शत्रूला ५६ इंच छाती दाखवण्याची – चाकणकर
प्रचंड टीकेनंतर सलमानने मौन सोडलं, सुशांत बद्दल केलं ‘हे’ विधान
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

