भोपाळ : घरी अठराविश्व दारिद्र्य… पण दारिद्र्याने लढायची प्रेरणा दिली.. अन् मग सुरू परिस्थितीला पायाशी झुकवण्याचा प्रवास… या प्रवासात अनेक खाचखळगे लागले… पण कोणत्याही परिस्थितीत न थांबता प्रवास पूर्ण करायचा असा चंग बांधून परिस्थितीला हरवायचं आणि उंच उडून आकाशाला गवसणी घालायची ही जिद्द होती एका चहावाल्याच्या मुलीची. अर्थात आंचल सुरेश गंगवाल हिची.
वंचित बहुजन आघाडीचे शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी शेताच्या बांधावर आंदोलन
मध्य प्रदेशमधील चहावाल्याच्या मुलीनं गरुड भरारी गेत थेट भारतीय हवाईदलात आपला झेंडा रोवला आहे. मध्यप्रदेशमधील निमच गावातील सुरेश गंगवाल यांच्या आंचल गंगवाल या मुलीनं आपल्या बापाचं नाव देशात केलं आहे. आंचल गंगवाल एअरफोर्स अॅकेडमीत अव्वल आली असून आता ती फ्लाईंग ऑफिसर’ म्हणून आकाशात झेप घेणार आहे.
२० जून रोजी हैदराबाद येथील डंडीगल वायुदल अकादमीत पार पडलेल्या कंबाइंड ग्रॅज्युएशन परेडमध्ये मध्य प्रदेशमधील छोट्या गावातून आलेल्या आंचल गंगवाल हिनं प्रथम क्रमांक पटकावला आहे. २० जून रोजी झालेल्या परेडकडे गंगवाल कुटुंबासह निमच गावाचं लक्ष लागलं होतं. २१ तारखेला होणाऱ्या जागतिक पितृदिनाच्या पूर्वसंध्येला मुलीने केलेल्या कामगिरीमुळे सुरेश गंगवाल यांची छाती फुलून आली होती. आंचल गंगवाल हिला परेडमधील मार्च पास्ट नंतर वायुदल प्रमुख एअर चीफ मार्शल बीकेएस भदौरिया यांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले.
धोकेबाज चीनची आर्थिक नांगी ठेचा; आरपीआय’ची मागणी
आंचल गंगवाल हिचे वडील सुरेश गंगवाल मध्य प्रदेशमधील निमच येथे चहा विकण्याचा व्यवसाय करतात. सुरेश यांनी चहा विकून आपल्या तिन्ही मुलांचे आयुष्य उज्वल केलं आहे. सुरेश यांचा मोठा मुलगा इंजिनिअर आहे तर आंचल आता फ्लाईंग ऑफिसर झाली असून छोटी मुलगी बी. कॉम मध्ये शिक्षण घेत आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

