🕒 1 min read
मुंबई : रत्नागिरीतील जो शिवसैनिक नाणार रिफायनरीला समर्थन करेल त्याचं थोबाड फोडा, अशी ताकीद शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी दिली आहे. नाणार प्रकल्पा विरोधातील जाहीर सभेत राऊत यांनी ही भूमिका मांडली आहे.
मागील काही दिवसांपासून अनेक शिवसेना पदाधिकारी नाणार रिफायनरीच्या समर्थनार्थ उघडउघड भूमिका घेताना दिसत आहेत. त्यामुळे विनायक राऊत चांगलेच आक्रमक झाले आहेत. जो कोणी प्रकल्पाला समर्थन करेल त्याला सक्त ताकीद दिली आहे.
त्यानंतर देखील शिवसैनिकांनी या प्रकल्पला पाठींबा दिल्याच भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी सांगितल असून, खासदार विनायक राऊत यांच्यावर जोरदार आगपाखड केली आहे. ‘हा खासदार नाही कोकणातला कोरोना व्हायरस आहे. जिथे जातो तिथे घाण करतो. कालच्या नाणार रिफायनरी प्रकल्प समर्थनाच्या सभेत शिवसैनिक जास्त होते. परवा जी धमकी मीटर चोर राऊत देऊन गेला होता ती नेहमप्रमाणे फुसकी ठरली.’ अशी घणाघाती टीका निलेश राणे यांनी केली आहे.
हा खासदार नाही कोकणातला कोरोना व्हायरस आहे. जिथे जातो तिथे घाण करतो. कालच्या नाणार रिफायनरी प्रकल्प समर्थनाच्या सभेत शिवसैनिक जास्त होते. परवा जी धमकी मीटर चोर राऊत देऊन गेला होता ती नेहमप्रमाणे फुसकी ठरली. pic.twitter.com/9UoZqN8mpH
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) March 3, 2020
यापूर्वी देखील निकेश राणे यांनी विनायक राऊत यांच्यावर अत्यंत कडवट भाषेत टीका केली होती. ‘मीटर चोर राऊत सारखा हलकट नसेल. ज्या शिवसैनिकांनी जिवाचं रान करून मोदी लाटेत ह्याला निवडून आणला त्याच शिवसैनिकांना चपलेने मारायची वार्ता करतो. खाज आल्यावर कुत्रा पिसळतो तसा हा पिसळलाय.’ असा समाचार राणे यांनी घेतला होता.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

