Nilesh Rane | मुंबई : भाजप नेते निलेश राणे यांनी राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि शिवसेना नेते भास्कर जाधव यांच्यावर जोरदार टीका केली आहे. विरोधक सतत सत्ताधारकांवर आरोप करताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर ही टीका करण्यात आली आहे. तर याच कारणामुळे काही दिवसांपुर्वीच भाजप नेते आशिष शेलार यांनी देखील उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता.
यादरम्यान, भास्कर जाधवांना ( Bhaskar Jadhav ) कोकणात बिनकामाचा बैल म्हणतात, ते एक कार्टून आहेत आम्ही त्यांना बैल म्हणतो असं म्हणत येत्या सोमवारी चिपळूण मध्ये सभा घेऊन भास्कर जाधव यांची पोलखोल करणार, असा इशारा निलेश राणेंनी ( Nilesh Rane ) दिला आहे.
शिंदे-फडणवीस सरकार चांगलं काम करतं आहे, कोण खुश कोण ना खुश यावर राष्ट्रवादीचे लक्ष आहे का? राष्ट्रवादी काँग्रेस बेरोजगार झाली का? सतत सरकारच्या कामावर बोलणं योग्य नाही, जयंत पाटील काहीही बोलत असतात, हवेत गोळीबार करत असतात, असं निलेश राणे म्हणाले.
सत्तेत असताना केंद्र सरकारच्या नावानं, विरोधी पक्षात असताना कधी न्यायालयाच्या नावानं, कधी निवडणूक आयोगाच्या नावानं उद्धव ठाकरे रडतात. उद्या अंधेरीत पराभूत झाला तर अंधेरीच्या जनतेच्या नावानं रडतील त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना ही रडकी सेना आहे, असा टोला आशिष शेलार यांनी लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- ओ वाचवा…वाचवा..! ड्रायव्हर त्रास देतोय ! पुण्यात बसमध्ये प्रवाशाचा गोंधळ ; VIDEO व्हायरल
- APJ Abdul Kalam Birth Anniversary | ‘अयशस्वी म्हणजे अपयश नाही’ असा संदेश देणारे, डॉ. अब्दुल कलाम यांची आज जयंती
- Shalini Thackeray | ‘कांदे बाई’ उल्लेख करत शालिनी ठाकरेंनी किशोरी पेडणेकरांची उडवली खिल्ली
- Breaking News | साईबाबा यांची निर्दोष मुक्तता सर्वोच्च न्यायालयाने नाकारली ; फडणवीसांच्या प्रयत्नांना यश आल्याचे भाजपचे ट्वीट
- Amit Thackeray | “… असं झाल्यास मी ही विधानसभा निवडणूक लढू शकतो”, अमित ठाकरे विधानसभा निवडणूक लढणार?


