Share

शिवसेना-भाजप एकत्र येणार ! हे मनोहर जोशींचे वैयक्तिक मत : नीलम गोऱ्हे

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी शिवसेना-भाजप विषयी मोठे विधान केले आहे. शिवसेना आणि भाजप भविष्यात कधीही एकत्र येऊ शकतात, असे वक्तव्य मनोहर जोशी यांनी केले आहे. त्य्तामुळे राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चांना उधान आले आहे. यावर शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

त्या म्हणाल्या की, मनोहर जोशींनी केलेलं विधान वैयक्तिक, ती भूमिका शिवसेनेची नाही. त्यांच्या पिढीच्या मनात हे अशाप्रकारच्या भावना स्वाभाविक आणि भावनिक असलं तरीही तरीसुद्धा ती पक्षाची भूमिका नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना ही महाविकास आघाडी मजबूत आहे. चांगल्याप्रकारे ती लोकांसाठी काम करत आहे. भाजपा मित्रपक्षांना संपविण्याच्या दृष्टीने काम करतं. ते व्यवहार्य नाही. त्यामुळे मनोहर जोशींचे विधान हे शिवसेनेची अधिकृत भूमिका नाही, असं त्यांनी सांगितले आहे.

मनोहर जोशी हे ANI या वृत्तसंस्थेंशी बोलातान म्हणाले की, ज्यावेळी कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळत नाही, त्यावेळी मतं गोळा करण्याच्या निमित्तानं, पक्ष विस्ताराच्या दृष्टीनं अशा गोष्टी घडतात. तसं सध्या शिवसेना आणि भाजपा यांच्याबाबतीत झालं आहे. याचा अर्थ आम्ही भाजपाबरोबर कधीच जाणार नाही, असं नाही. योग्य वेळ येताच माननीय उद्धवजी योग्य भूमिका घेतील, अशी मला खात्री आहे.

दरम्यान विधानसभा निवडणुकीत जनतेने सेना-भाजप महायुतीला बहुमत दिले होते. मात्र भाजपाशी फारकत घेत शिवसेनेने जवळीक केली. त्यानंतर मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतली. त्यामुळे 30 वर्षाच्या मित्राला सोडून शिवसेनेने कॉंग्रेस आघाडी सोबत जात राज्याची सूत्र आपल्या हाती घेतली आहेत.

महत्वाच्या बातम्या

https://twitter.com/Maha_Desha/status/1204610862658416640?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1204606993438146560?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1204600860392583169?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!