Share

T20 World Cup | पाकिस्तान-इंग्लंड सामन्यापूर्वी आयसीसीने केले प्लेईंग कंडिशनमध्ये ‘हे’ मोठे बदल

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा: टी 20 विश्वचषक (T20 World Cup) सामना आता अंतिम पडावाकडे आला आहे. रविवारी म्हणजेच 13 नोव्हेंबर 2022 रोजी टी 20 विश्वचषक स्पर्धेमधील अंतिम महामुकाबला (Final) इंग्लंड (England) आणि पाकिस्तान (Pakisthan) या दोन्ही संघांमध्ये खेळाला जाणार आहे. मेलबन क्रिकेट ग्राउंडवर हा ऐतिहासिक सामना होणार आहे. तर या सामन्यापूर्वी आयसीसीने प्लेईंग कंडिशनमध्ये काही मोठे बदल केल्याची माहिती समोर आली आहे. इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या या अंतिम सामन्यांमध्ये पावसामुळे व्यत्यय येण्याची शक्यता आहे. त्यामुळे हवामानाचा अंदाज घेत आयसीसीच्या इव्हेंट टेक्निकल कमिटीने (ETC) या अंतिम सामन्यासाठी राखीव दिवसाच्या (14 नोव्हेंबर) वेळेत अतिरिक्त वाढ केली आहे.

आयसीसीच्या इव्हेंट टेक्निकल कमिटीने निर्णय घेतला आहे, की सामना खेळण्यासाठी आणि अंतिम निकाल मिळवण्यासाठी सामन्याच्या अतिरिक्त दिवसाच्या वेळेत दोन ते चार तासापर्यंत वाढ केली जाऊ शकते. हवामानामुळे सामन्यामध्ये व्यत्यय आला तरी विश्वचषकातील हा अंतिम सामना सर्वतोपरी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जातील. दरम्यान, गरज पडल्यास आवश्यक तितकी षटके देखील कापली जातील. तर निर्धारित दिवशी किमान षटके खेळून झाली नाही तर राखीव दिवशी सामना खेळायला जाईल.

हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, मेलबर्नमध्ये रविवारी 95 टक्के पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान 25 मिमी पाऊस पडू शकतो असे देखील हवामान खात्याने म्हटले आहे. अंतिम सामन्या दिवशी म्हणजेच रविवारी मुसळधार पाऊस आणि विजांच्या गडगडांची खूप जास्त शक्यता आहे. त्याचबरोबर राखीव दिवशी म्हणजे सोमवारी देखील 90 टक्के पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

टी 20 विश्वचषक (T20 World Cup) मध्ये पाकिस्तान आणि इंग्लंडचा संघ

इंग्लंडचा संघ:
जोस बटलर (कर्णधार), मोईन अली, हॅरी ब्रूक, सॅम करन, ख्रिस जॉर्डन, लियाम लिव्हिंगस्टोन, डेविड मलान, आदिल रशीद, फिलिप सॉल्ट, बेन स्टोक्स, डेव्हिड विली, ख्रिस वोक्स, मार्क वूड, अॅलेक्स हेल्स, टायमल मिल्स.

पाकिस्तानचा संघ:
बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, आसिफ अली, हैदर अली, हरिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदील शाह, मोहम्मद हसनैन, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वसीम जूनियर, नसीम शाह, शाहीन आफ्रिदी, शान मसूद, फखर जमान, मोहम्मद हॅरीस

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!