Share

Bipasha Basu | बिपाशा बासू आणि करण ग्रोवर यांना प्राप्त झाले कन्यारत्न

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: बॉलीवूड (Bollywood) अभिनेत्री बिपाशा बासू (Bipasha Basu) आणि अभिनेता करण सिंग ग्रोवर (Karan Singh Grover) आज आई-वडील झाले आहेत. बिपाशा ने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. बिपाशा आणि करण अनेक दिवसांपासून या आनंदाच्या बातमीची वाट बघत होते. अखेर या दोघांच्या आयुष्यातील या नव्या प्रवासाचा आनंद त्यांना मिळाला आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये बिपाशा आणि करणणे आपल्या गर्भधारणेची घोषणा केली होती. त्याचबरोबर बिपाशा आणि तिचे बेबी बंपचे फोटो देखील शेअर केले होते.

एका मुलाखतीमध्ये बिपाशाने सांगितली होते की, ती आणि करण कोविडच्या आधी बाळाला जन्म देण्याचा विचार करत होते. पण वाढत्या कोविडच्या रुग्णांमुळे त्यांनी हा विचार सोडून दिला होता. त्यानंतर 2021 मध्ये दोघांनी पुन्हा प्रयत्न केला आणि त्यानंतर बिपाशाने आज ही गोड बातमी दिली आहे. त्याचबरोबर मुलाखती दरम्यान बिपाशा म्हणाली होती की, करण जितका परफेक्ट नवरा आहे तितकाच तो परफेक्ट वडील देखील बनेल.

काही दिवसांपूर्वी बिपाशा बसू हिने तिच्या मॅटरनिटी शूटचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहे. बिपाशा बासूने तिचे बेबी बंप प्लांट करत एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. बिपाशा बसू आणि करण ग्रोव्हरचा हा व्हिडिओ चाहत्यांचे लक्ष वेधून घेत होता. बिपाशाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहत्यांकडून त्याची प्रशंसा मिळाली होती.

बॉलीवूडमध्ये गेल्या वर्षभरात अनेक अभिनेत्रींनी गोड बातमी दिली आहे. यामध्ये अभिनेत्री प्रियंका चोपडाने मालतीच्या माध्यमातून तर अभिनेत्री सोनम कपूर हिने वायूच्या माध्यमातून आणि आलिया भट्ट ने सुंदर लक्ष्मीच्या रूपात गोड बातमी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!