Share

Best Sedan Car | ‘या’ आहेत भारतातील सर्वोत्तम सेडान कार

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा: बदलत्या तंत्रज्ञानामुळे देशातील वाहक उत्पादन कंपन्या आपले मॉडेल्स नवनवीन वैशिष्ट्यांसह सादर करत आहे. तर, दुसरीकडे देशांमध्ये सध्या सेडान कार (Sedan Car) ची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्याचबरोबर देशातील युवकांमध्ये देखील सेडान कारची एक वेगळीच क्रेझ आहे. त्यामुळे प्रत्येक वाहन उत्पादन कंपनी आपल्या कंपनीचे सर्वोत्तम सेडान मॉडेल आपल्या ग्राहकांना देण्याचा प्रयत्न करत आहे. अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही ही सेडान कार घ्यायचा विचार करत असाल, तर आज या बातमीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला देशातील सर्वोत्तम सेडान कारबद्दल माहिती सांगणार आहोत.

होंडा सिटी (Honda City)

देशातील आघाडीची कार उत्पादक कंपनी होंडाच्या कॉम्पॅक्ट सेडानला 1.5L पेट्रोल इंजन उपलब्ध आहे. जे 119PS पॉवर आणि 145Nm टार्क निर्माण करतो. त्याचबरोबर ही कार 17.4kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे. तर, या कारमध्ये 5-स्पीड मॅन्युअल आणि CVT चा पर्याय देखील उपलब्ध आहेत. ही कार सनरूफ, लेदर इंटीरियर आणि एलईडी हेडलाइट्स, उंची-अ‍ॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट, ऑटो एसी आणि पॉवर-फोल्डिंग ORVM इत्यादी फीचर्स बाजारात उपलब्ध आहे. या कारची सुरुवातीची एक्स शोरुम किंमत 9.5 लाख रुपये एवढी आहे.

ह्युंदाई वर्ना (Hyundai Verna)

ह्युंदाई वर्ना ही कार बाजारामध्ये तीन इंजिन पर्यायसह उपलब्ध आहे. यामध्ये 1.5L पेट्रोल इंजिन उपलब्ध आहे. जे 115PS पॉवर आणि 144Nm टार्क निर्माण करतो. त्याचबरोबर यामध्ये 1.5L डिझेल इंजिन उपलब्ध असून ते 115PS पॉवर आणि 250Nm टार्क जनरेट करते. या कारमध्ये 6-स्पीड MT पर्याय उपलब्ध आहे. कारची एक्स-शोरूम किंमत 9.41 लाख रुपये आहे.

मारुती सियाझ (Maruti Ciaz)

मारुतीची ही सेडान कार 1.5L, माइल्ड हायब्रीड पेट्रोल युनिटसह बाजारात उपलब्ध आहे. जे 105PS पॉवर आणि 138Nm टार्क निर्माण करू शकते. त्याचबरोबर या कारमध्ये 5-स्पीड मॅन्युअल आणि पर्यायी 4-स्पीड टार्क कन्व्हर्टरचा पर्याय दिलेला आहे. ही कार बाजारामध्ये अॅपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटो, ऑटो-एलईडी हेडलॅम्प, ऑटो क्लायमेट कंट्रोल इत्यादी फीचर्स उपलब्ध आहे. या कारची एक्स-शोरूम किंमत 8.99 लाख रुपये एवढी आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!