Share

‘पुढच्या दसरा मेळाव्याला शिवसेनेचा मुख्यमंत्री मंचावर असेल’

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा – विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर दरवर्षीप्रमाणे मुंबईत शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडला. या मेळाव्यात बोलताना शिवसेना खासदार संजय राउत यांनी पुढच्या वर्षी दसरा मेळाव्याला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शेजारी शिवसेनेचा मुख्यमंत्री बसलेला असेल असं विधान केले आहे.

पुढे बोलताना राउत यांनी ‘चांद्रयान कलंडले असले तरी २४ तारखेच्या निकालानंतर आदित्य ठाकरे यांचे यान मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावार उतरल्याशिवाय राहणार नाही, या निवडणुकीच्या निकालानंतर आदित्य यांच्या नेतृत्वाखाली शंभर आमदार निवडून येतील. २४ तारखेला बाळासाहेब ठाकरे यांना शंभर तोफांची सलामी देऊ असं विधान राऊत यांनी केले आहे.

या मेळाव्यात उद्धव ठकारे यांनी ‘शेतकऱ्यांना मला कर्ज माफी नाही कर्ज मुक्ती द्यायची आहे. युतीचं सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांना सातबारा कोरा करणार असल्याचं ठाकरे म्हणाले. तसेच राम मंदिर हा आमच्यासाठी राजकारणाचा विषय नाही. राम मंदिर आमच्या आस्थेचा मुद्दा आहे अयोध्येत राम मंदिर व्हावं, ही बाळासाहेबांची इच्छा होती, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

दरम्यान, ठाकरे यांनी ‘ पर्यंत आम्ही काँग्रेसचे टार्गेट आहोत, तोपर्यंत तेही आमचे टार्गेट राहणार काँग्रेस राष्ट्रवादीवाल्यांनो आमच्या विजयाचे पेढे खाण्यासाठी ताजेतवाने राहा अजित पवारांच्या कर्माने त्यांच्या डोळ्यात पाणी आलं, आजपर्यंत मगरीच्या डोळ्यात असं पाणी पाहिलं होतं असा टोलाही त्यांनी अजित पवारांना लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1181787238004191232?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1181786723438587904?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!