🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा:- विधानसभेचे बिगुल वाजले आहे. 21 ऑक्टोबरला राज्यात एकाच टप्यात मतदान होणार आहे. तर 24 ऑक्टोबरला निकाल जाहीर होणार आहे.मात्र भाजप – शिवसेना युतीचं घोंगड गेले अनेक दिवस भिजत पडल आहे.त्यामुळे शिवसेना आणि भाजपमध्ये युती होणार की नाही याची उत्सुकचा मतदारांमध्ये आणि चिंता या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये लागून राहिलेली असताना दुसरीकडे या पक्षांचे नेते कोणतीही स्पष्ट भूमिका सांगायला तयार नाहीत.
त्यातच आता शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी केलेल्या वक्तव्यामुळे या मुद्द्यावरून नवी चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे. ‘पुढचा मुख्यमंत्री आमचाच होणार’, असं मनोहर जोशी म्हणाले आहेत. त्यामुळे नक्की शिवसेना आणि भाजपचं युतीबद्दल काय ठरलंय? असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे.
दरम्यान मुंबईच्या रंगशारदा नाट्यगृहामध्ये शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्ते आणि इच्छुक उमेदवारांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी देखील उपस्थित होते.यावेळी त्यांना पत्रकारांनी आगामी मुख्यमंत्री कोण असेल? असा प्रश्न विचारला, तेव्हा मनोहर जोशी म्हणाले, शिवसेना-भाजपची युती होणार आहे आणि आगामी मुख्यमंत्री आमचाच होईल. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जोशींच्या या वक्तव्यावरून पुन्हा एकदा दोन्ही पक्षांच्या युतीसंदर्भात नवी चर्चा सुरू झाली आहे.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1177915400673120256?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1177915531996758016?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
