टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. अशातच युती असलेले शिवसेना आणि भाजप नेते मुख्यमंत्री पदावर दावा करत आहेत. काहीही झाल तरी मुख्यमंत्री आमच्याचं पक्षाचा होणार असा दावा दोनही पक्ष करत आहेत.
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री हा भाजपचाचं होणार आहे कारण सध्या कमळाची मागणी जास्त आहे. त्यामुळे मुख्यमंत्री भाजपचाच होईल असं ते म्हणाले आहेत. तसेच जागावाटपाबद्दल बोलताना आरपीआयला10 जागा मिळतील अशी अपेक्षा होती. शिवसेनेकडून काही जागा मिळतील अशी अपेक्षा होती. मात्र, त्या मिळाल्या नाहीत. आमची नाराजी आहे असं ते म्हणाले.
तसेच पुढे बोलताना 5 जागा आम्हाला मिळाल्या आहेत. 4 महामंडळे आणि 4 विधानपरिषद, 1 राज्यमंत्री आणि 1 कॅबिनेट मंत्रिपद आम्हाला मिळणार आहे. त्यामुळे आमची नाराजी दूर झाली आहे असं ते म्हणाले आहेत. तसेच वंचितला लोकसभेत लोकांचा चांगला पाठिंबा होता. मात्र, विधानसभा निवणुकीत त्यांना तो पाठिंबा भेटणार नसल्याचेही आठवले म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1181545201522761728?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1181544997486678016?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1181536071865122816?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

