Share

छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखविलेल्या मागार्नेच महाराष्ट्राचा कारभार चालेल

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्नी रश्मी ठाकरे यांच्यासह शिवनेरीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळाचे दर्शन घेऊन अभिवादन केले. त्यानंतर "शिवकुंज" सभागृहातील राजमाता जिजाऊ व महाराजांच्या पूणार्कृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला.

या प्रश्नी त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, ”सामान्य रयतेच्या कल्याणासाठी छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची स्थापना केली. दीन, दलित, आदिवासी, शोषित, शेतकरी, शेतमजूर, महिलांच्या कल्याणाची प्रेरणा शिवछत्रपतींच्या कायार्तूनच आम्हाला मिळाली आहे. त्यांनी दाखविलेल्या मागार्नेच महाराष्ट्राचा कारभार चालेल, असा विश्वास मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज येथे बोलताना व्यक्त केला.

ते पुढे म्हणाले, मुख्यमंत्री झाल्यानंतर मुंबईच्या बाहेर पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांचे आशीर्वाद घेण्यासाठी येथे आलो आहे. या शिवजन्मभूमीत राजमाता जिजाऊ आणि शिवछत्रपती यांचे आशीर्वाद घेतल्यानंतर त्यांना अपेक्षित असणारे रयतेचे राज्य आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे. सामान्य रयतेला दिलासा देणारे, त्यांना न्याय देणारे कामच या ठिकाणी केले जाणार आहे. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ही मोठी जबाबदारी असून सर्वांना अभिमान वाटेल असा महाराष्ट्र घडवू या, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

महत्त्वाच्या बातम्या :

https://twitter.com/Maha_Desha/status/1205069485108944897?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1205070072974233600?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!