Share

ईडीची पिडा टाळायची असेल तर कमळाचे फूल जवळ ठेवा,संजय राऊतांचा भाजपला टोला

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा:- शिवसेना नेते संजय राऊत यांनी ईडीची खिल्ली उडवणारं एक व्यंगचित्र ट्विट केलं आहे. सध्या माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम, राज ठाकरे किंवा शरद पवार त्यांच्यामागे ईडीने चौकशी लावली आहे.यावरूनच संजय राऊत यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून ईडीवर निशाणा साधला आहे.

संजय राऊतांनी एक व्यंगचित्र शेअर केले आहे. यामध्ये एक नेता ज्योतिषाला भविष्य पाहण्यासाठी हात दाखवत आहे. तेव्हा ज्योतिषी त्याला सांगतो की तुम्हाला शनिपेक्षा डेंजर ईडी पिडा सुरु होण्याची चिन्हं आहेत. त्यावर उपाय म्हणजे कमळाचं फूल जवळ ठेवा. ईडीचं नाव ऐकताच व्यंगचित्रातला नेता खूप घाबरलेला दाखवण्यात आला आहे. संजय राऊत यांनी हे व्यंगचित्र पोस्ट करुन ईडीची खिल्ली उडवली आहे आणि भाजपलाही टोला लगावला आहे.

दरम्यान शरद पवार यांच्यावर शिखर बँक प्रकरणात ईडीने गुन्हा दाखल केल्यावर ते स्वतःच ईडी कार्यालयात हजर राहणार होते. त्यासाठी त्यांनी शुक्रवारी ईडी कार्यालयात जाण्याचा निर्णय घेतला होता. मात्र ईडीने तुम्ही आत्ता येऊ नका गरज असेल तेव्हा आम्ही तुम्हाला बोलवू असं सांगितलं. ज्यानंतर शरद पवार यांनी ईडी कार्यालयात जाणं तहकूब केलं.यानंतर राज्यभरात फक्त ईडीचीच चर्चा सुरू आहे. सोशल मीडियावरही याविषयी अनेक मीम्स व्हायरल होत आहेत.त्याच अनुषंगाने संजय राऊतांनी एक व्यंगचित्र ट्विट करत ईडीची खिल्ली उडवली आहे.

https://twitter.com/Maha_Desha/status/1178168780989448193?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1178168959176019969?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!