🕒 1 min read
पुणे : ज्येष्ठ इतिहासकार पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर मागील काही दिवसांपासून पुण्यातील दीनानाथ मंगशेकर रूग्णालयात उपचार सुरु होते. मात्र उपचार सुरु असताना आज पहाटे ५ वाजून ७ मिनिटांनी त्यांचे दु:खद निधन झाले. वयाच्या १०० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधानानंतर अनेक राजकीय नेत्यांनी ट्वीट करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विट करत लिहिले की, ‘ज्येष्ठ इतिहासकार पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे त्यांनी अत्यंत रसाळ शैलीत आणि ओघवत्या भाषेत श्री शिवराय घराघरात पोहोचवण्याचे कार्य केले ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो..!! ॐ शांती…’, असे म्हणत त्यांनी दु:ख व्यक्त केले.
ज्येष्ठ इतिहासकार पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे त्यांनी अत्यंत रसाळ शैलीत आणि ओघवत्या भाषेत श्री शिवराय घराघरात पोहोचवण्याचे कार्य केले
ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो..!!
ॐ शांती…????#शिवशाहीर #शिवशाहीर_बाबासाहेब_पुरंदरे pic.twitter.com/KZbLUaV7sg
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) November 15, 2021
बाबासाहेब पुरंदरे यांना 2015 मध्ये महाराष्ट्र सरकारने राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘महाराष्ट्र भूषण’ देऊन गौरव केला होता. त्यांनी इतिहास संशोधनात केलेल्या कार्याची दखल घेत त्यांचा पद्मविभूषण पुरस्काराने गौरव करण्यात आला होता. बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवचरित्रावर देश-विदेशात सुमारे 12 हजारांपेक्षा अधिक व्याख्याने दिली आहेत.
रुग्णालयाने जारी केलेल्या पत्रकात म्हंटले आहे की, आदरणीय पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांचे रुग्णालयात उपचार घेत असताना वृद्धापकाळाने आज दिनांक १५ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी ५ वाजून ०७ मिनिटांनी दु:खद निधन झाले. त्यांचे पार्थिव सकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी त्यांच्या पर्वती येथील निवासस्थानी नेण्यात येईल. अंत्यसंस्कार सकाळी १० वाजता वैकुंठ स्मशानभूमीत केले जाणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- अन्यायाविरोधात लढणाऱ्यांना नक्षलवादी म्हणता येणार नाही- शरद पवार
- शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन
- …त्यांचे जाणे अत्यंत वेदनादायी- नितीन गडकरी
- ‘जेव्हा राज्यात शरद पवारांचं सरकार येतं, तेव्हा दंगली घडतातच’
- …अन्यथा उच्च न्यायालयात जाणार; कंगना विरोधात पुण्यात गुन्हा दाखल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
