Share

काही लोकांनी महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याची सुपारी घेतली होती : राष्ट्रवादी

Published On: 

मुंबई : कौशल्य विकासासाठी विविध उपक्रम, स्टार्टअप्सला चालना, वेगवेगळ्या प्रकारचे इनोव्हेशन तथा संकल्पनांचा विकास आदींमधील नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी नीती आयोगामार्फत दिल्या जाणाऱ्या ‘इंडिया इनोव्हेशन इंडेक्स’मध्ये महाराष्ट्राने यश मिळविले आहे.

नीती आयोगाने २० जानेवारी २०२१ रोजी ‘ इंडिया इनोव्हेशन इंडेक्स २०२० ‘ हा आपला दुसऱ्या प्रकाशनाचा निकाल जाहीर केला असून यामध्ये तामिळनाडू प्रथम तर महाराष्ट्र राज्य दुसऱ्या स्थानी आले आहे. राज्याने २०१९ मध्ये असलेल्या तिसऱ्या क्रमांकावरून २०२० मध्ये दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे.

राज्यातील उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारसाठी हे खूप मोठे यश आहे. कोरोना काळात महाराष्ट्राची ही उपलब्धी महत्वाची आहे. काही लोकांनी महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याची सुपारी घेतली होती आणि नीती आयोगाचा हा अहवाल त्यांचा प्रयत्नांना चपराक आहे असे प्रतिपादन महेश तपासे, मुख्य प्रवक्ता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांनी केले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!